Gahu Kharedi : देशांतर्गत मार्केटमध्ये गव्हाची मोठी आवक होऊ लागली आहे. त्यातच हमीभावाने शेतमाल विक्रीसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. असे असताना गहू खरेदीसंदर्भात एक नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशामुळे गहू विकणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने आपल्या नवीन निर्देशात म्हटले आहे की, शेतकरी नोंदणीशिवायही शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांवर आपला गहू विकू शकतील. गहू विकताना शेतकऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकरी पूर्वीप्रमाणेच खरेदी केंद्रांवर आपला गहू विकू शकतील. उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशात ३० मार्चपासून गव्हाची खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत खुली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक सूचना दिल्या आहेत की, आपला माल विकण्यासाठी खरेदी केंद्रांवर येणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. हवामानाचा विचार करून, सावली, पाणी आणि बसण्याची सोय यासह सर्व आवश्यक व्यवस्था वेळेवर करावी.
गहू खरेदी १५ जून पर्यंत गहू खरेदी १५ जून पर्यंत सुरू राहील. उत्तर प्रदेशात गहू खरेदी ३० मार्च ते १५ जून पर्यंत सुरू राहील. शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत (MSP), म्हणजेच ₹२,५८५ दराने गहू खरेदी केला जाईल. उत्तर प्रदेशात २,२४,६७४ नोंदणीकृत शेतकरी आहेत, ज्यांना गहू विक्रीसाठी एमएसपी दराचा लाभ घेता येईल. राज्यभरात ६,५०० गहू खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सरकारी निर्देशानुसार, शेतकऱ्यांना गहू उतरवणे, चाळणे आणि साफसफाईसाठी अतिरिक्त २० दिले जातील.
Web Summary : Uttar Pradesh allows wheat sales at MSP without mandatory farmer ID registration. This decision aims to ease farmer inconvenience during procurement. The purchase will continue until June 15, with rates at ₹2,585 per quintal. Farmers get ₹20 extra for cleaning.
Web Summary : उत्तर प्रदेश ने किसान आईडी पंजीकरण के बिना एमएसपी पर गेहूं की बिक्री की अनुमति दी। खरीद के दौरान किसानों को होने वाली असुविधा को कम करना है। खरीद 15 जून तक जारी रहेगी, दरें ₹2,585 प्रति क्विंटल हैं। किसानों को सफाई के लिए ₹20 अतिरिक्त मिलेंगे।