Join us

Gahu Bajar Bhav : पुणे आणि नागपूर बाजारात शरबती गव्हाला क्विंटलमागे काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 19:56 IST

Gahu Bajar Bhav : आज काही निवडक बाजार समितीमध्ये गव्हाची 4065 क्विंटलची आवक झाली.

Gahu Bajar Bhav :  आज बहुतांश बाजार समित्यांना सुट्टी असल्याने काही निवडक बाजार समितीमध्ये गव्हाची 4065 क्विंटलची आवक झाली. यात गव्हाला कमीत कमी 2500 रुपयांपासून सरासरी 04 हजार 800 पर्यंत दर मिळाला. 

आज नागपूर बाजारात शरबती गव्हाची (Sharbati Gahu Market) 2000 क्विंटलचे आवक होऊन कमीत कमी 03 हजार रुपये तर सरासरी 3375 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात 437 क्विंटल आवक होऊन कमीत कमी 04 हजार रुपये तर सरासरी 04 हजार 800 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला.

तर दुसरीकडे अहिल्यानगर बाजारात लोकल गव्हाची (Local Gahu Market) 103 क्विंटल आवक होऊन कमीत कमी 2300 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला. पाचोरा बाजारात सर्वसाधारण गव्हाची 150 क्विंटल आवक होऊन कमीत कमी 2481 रुपये तर सरासरी 2651 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात लोकल गव्हाची 1375 क्विंटल होऊन सरासरी 2483 रुपये दर मिळाला. 

आजचे गहू बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/03/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल103230028002500
जळगाव---क्विंटल150248129502651
नागपूरलोकलक्विंटल1375235025282483
नागपूरशरबतीक्विंटल2000300035003375
पुणेशरबतीक्विंटल437400056004800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4065 
टॅग्स :गहूशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीपुणे