Join us

Cotton Market: 'या' जिल्ह्यात थांबतेय कापूस खरेदी; तुमचा कापूस विकलात का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:39 IST

Cotton Market : शेतकरी बंधूंनो, जर तुमच्याकडे अजून कापूस साठवून ठेवला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण परभणी बाजार समिती २८ मेनंतर कापूस खरेदी करणार नाही. वाचा सविस्तर (Cotton Market)

Cotton Market:  शेतकरी बंधूंनो, जर तुमच्याकडे अजून कापूस साठवून ठेवला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण परभणी बाजार समिती २८ मेनंतर कापूस खरेदी करणार नाही.(Cotton Market)

कापूस हंगाम २०२४-२५ अंतर्गत परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहीर लिलाव प्रणालीद्वारे सुरू असलेली कापूस खरेदी प्रक्रिया २८ मे २०२५ पासून बंद करण्यात येणार आहे. यासंदर्भात बाजार समितीने अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी करत शेतकऱ्यांना त्वरित कृती करण्याचे आवाहन केले आहे.  (Cotton Market)

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, संचालक मंडळ आणि सचिव यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांनी ही अंतिम तारीख लक्षात ठेवून २८ मेपूर्वीच शिल्लक कापूस बाजारात विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  (Cotton Market)

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही कापूस खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, हंगाम आता संपत आल्यामुळे कापूस खरेदी प्रक्रियेची समाप्ती घोषित करण्यात आली आहे. यानंतर बाजार समितीमार्फत लिलावाद्वारे कोणतीही खरेदी केली जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.  (Cotton Market)

शेतकऱ्यांसाठी सूचना  

* कापूस अजूनही शिल्लक असल्यास २८ मेच्या आतच बाजार समितीत विक्रीस आणावा.

* उशीर झाल्यास साठवणूक अडचणी, हमीभाव न मिळणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

* हवामान बदल लक्षात घेता पावसाच्या शक्यतेमुळे कापूस भिजण्याचा धोका आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav: तुरीच्या दरात उसळी! मलकापूर, कारंजा, वर्धा बाजारात सर्वाधिक आवक वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती