Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Chia Seed Market : हळद विकावी की थांबावी? चियाच्या तेजीने बदलली गणितं

Chia Seed Market : हळद विकावी की थांबावी? चियाच्या तेजीने बदलली गणितं

latest news Chia Seed Market: Should turmeric be sold or stopped? The rise of chia has changed the math | Chia Seed Market : हळद विकावी की थांबावी? चियाच्या तेजीने बदलली गणितं

Chia Seed Market : हळद विकावी की थांबावी? चियाच्या तेजीने बदलली गणितं

Chia Seed Market : चिया आणि हळद या दोन्ही पिकांच्या दरात झालेल्या मोठ्या चढ-उतारामुळे वाशिममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चियाच्या दरात उसळी आल्याने काहींना दिलासा मिळाला असला तरी हळदीच्या घसरलेल्या दरामुळे बाजारातील अनिश्चितता अधोरेखित झाली आहे.(Chia Seed Market)

Chia Seed Market : चिया आणि हळद या दोन्ही पिकांच्या दरात झालेल्या मोठ्या चढ-उतारामुळे वाशिममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चियाच्या दरात उसळी आल्याने काहींना दिलासा मिळाला असला तरी हळदीच्या घसरलेल्या दरामुळे बाजारातील अनिश्चितता अधोरेखित झाली आहे.(Chia Seed Market)

वाशिम : जिल्ह्यातील कृषी बाजारपेठेत सध्या दोन वेगवेगळे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे चियाच्या दरात लक्षणीय वाढ होत उत्पादकांना दिलासा मिळत असताना, दुसरीकडे हळदीच्या दरात झालेल्या अचानक घसरणीमुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.(Chia Seed Market)

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून हळदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. (Chia Seed Market)

आठवड्याच्या सुरुवातीला हळदीने सुधारणा दाखवत १५ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. मात्र शनिवारी अचानक दर कोसळून कमाल दर १३ हजार २०० ते १३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले.

विशेष म्हणजे केवळ एका दिवसात सुमारे १,२०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यात सध्या हळदीचा हंगाम जोरात सुरू असून काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी प्रक्रिया करून विक्रीसाठी माल बाजारात आणत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये हळदीची आवक वाढली आहे.

शुक्रवारी आणि शनिवारीही सुमारे ७,५०० क्विंटल इतकी आवक कायम होती. मात्र आवक स्थिर असूनही दर घसरल्याने बाजारातील मागणी कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे चियाच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. ४ एप्रिल रोजी १५,५०० रुपये प्रति क्विंटल असलेला दर आठवड्याभरात १,२५० रुपयांनी वाढून शनिवारी १६,७५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला. यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

चियाच्या दरवाढीमागे वाढती मागणी आणि वाढलेली आवक हे प्रमुख कारण मानले जात आहे. ४ एप्रिल रोजी केवळ ६५० क्विंटल असलेली चियाची आवक ११ एप्रिल रोजी तब्बल ३,१५० क्विंटलपर्यंत वाढली. तरीही दर वाढल्याने बाजारात चियाला चांगली मागणी असल्याचे स्पष्ट होते.

सध्या हळदीच्या घसरत्या दरांमुळे आणि चियाच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हळद विकावी की काही दिवस थांबावे, याबाबत शेतकरी निर्णय घेण्यात अडचणीत आहेत. बाजारातील अस्थिरता पाहता पुढील काही दिवस दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

वाशिम बाजारपेठेत सध्या चिया तेजीत तर हळद मंदीत असल्याचे चित्र असून, शेतकऱ्यांनी बाजारभाव लक्षात घेऊन सावधपणे विक्रीचे निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Gahu Bajarbhav : शरबती गहू झाला 'हॉट'; सामान्य गव्हाचे दर मात्र दबावात

अधिक वाचा : Dhanya Bajarbhav : आखाती युद्धाचा थेट परिणाम; सोयाबीन-तूर तेजीत, गव्हातही सुधारणा वाचा सविस्तर

Web Title : चिया बूम ने समीकरण उलझाए: वाशिम बाजार में हल्दी की दुविधा

Web Summary : वाशिम के बाजार में चिया की कीमतें आसमान छू रही हैं, जिससे किसान खुश हैं। हालांकि, हल्दी की कीमतें अचानक गिर गईं, जिससे भ्रम पैदा हो गया। किसान बाजार की अस्थिरता के बीच हल्दी बेचने या इंतजार करने को लेकर अनिश्चित हैं।

Web Title : Chia Boom Upsets Equations: Turmeric Dilemma in Washim Market

Web Summary : Washim's market sees chia prices soaring, delighting farmers. However, turmeric prices suddenly dropped, causing confusion. Farmers are unsure whether to sell turmeric or wait, amid market volatility.