Join us
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2026 : अर्थसंकल्प 2026 सादर, आज 1 फेब्रुवारीला कांद्याला कुठे काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 17:58 IST

Budget 2026 : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक महिन्यांपासून कवडीमोल दरात कांदा विकावा लागत आहे.

Budget 2026 : आज एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक महिन्यांपासून कवडीमोल दरात कांदा विकावा लागत आहे. आजच्या दिवशी जवळपास ५९ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

आज चांदवड मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ९७० रुपये तर पारनेर मार्केटमध्ये कमीत कमी २०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी एक हजार रुपये आणि मंगळवेढा मार्केटमध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

तसेच जुन्नर आळेफाटा मार्केटमध्ये चिंचवड कांद्याला कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १३०० रुपये, राहता मार्केटमध्ये कमीत कमी ४०० रुपये, सरासरी ११०० रुपये, सातारा बाजारात सरासरी १५०० रुपये तर राहुरी मार्केटमध्ये केवळ ७०० रुपये असा सर्वसाधारण कांद्याला दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/02/2026
राहूरी---क्विंटल50671001300700
दौंड-केडगाव---क्विंटल491015016001000
सातारा---क्विंटल330100020001500
राहता---क्विंटल286840015501100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल12415100018001300
चांदवडलालक्विंटल100506001226970
पारनेरलालक्विंटल290020016001100
पुणेलोकलक्विंटल1965840016001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13120016001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल88750015001000
मंगळवेढालोकलक्विंटल3110015001100
English
हिंदी सारांश
Web Title : Budget 2026: Onion farmers disappointed; today's market rates unveiled.

Web Summary : Budget 2026 disappointed farmers. Onion prices vary: Chandwad ₹970, Parner ₹1100, Pune ₹1000, Mangalvedha ₹1100. Junnar ₹1300, Rahata ₹1100, Satara ₹1500, Rahuri ₹700.
टॅग्स :कांदाअर्थसंकल्प २०२६अर्थसंकल्प २०२५शेती क्षेत्रमार्केट यार्ड