Bajra Market : हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारातबाजरीच्या दरात चांगलीच गरमी निर्माण झाली आहे. यंदा पहिल्यांदाच ठोक बाजारातबाजरीला ज्वारीच्या तोडीस तोड भाव मिळत असून, दर प्रतिक्विंटल ३ हजार २०० ते ३ हजार ४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. (Bajra Market)
शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे उत्पादन घटल्याने दर्जेदार बाजरीला मोठी मागणी आहे. थंडी सुरू होण्याआधीच दरवाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळाले. (Bajra Market)
किंमतीत विक्रमी वाढ
गेल्या वर्षी २,८०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी बाजरी सध्या ३,२०० ते ३,४०० रुपये क्विंटल या भावाने विकली जात आहे. तर ज्वारीचे भाव सध्या ३,१०० ते ३,५०० रुपये क्विंटल आहेत. म्हणजेच बाजरी आता थेट ज्वारीच्या रांगेत पोहोचली आहे. हलक्या प्रतीची बाजरी मात्र २,५०० ते ३,००० रुपये क्विंटल दराने विकली जात आहे.
पावसाचा फटका आणि दर्जेदार बाजरीची कमतरता
शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरीच्या शेतांतील पीक काळे पडले. यामुळे उच्च प्रतीची बाजरी बाजारात कमी प्रमाणात येत असल्याने भाव वाढले आहे. सध्या चांगल्या प्रतीची बाजरी उपलब्ध नसल्याने दर कमी होण्याची शक्यता अत्यल्प आहे.-नीलेश सोमाणी, व्यापारी
भाकरी महागली!
पूर्वी ज्वारी ही गरिबाची भाकरी म्हणून ओळखली जायची. पण आता परिस्थिती उलटली आहे. ज्वारीला गव्हापेक्षा अधिक भाव मिळू लागलाच, त्यात आता बाजरीही त्याच भावात पोहोचल्याने गरिबांच्या ताटात भाकरी कोणती, हा प्रश्न उभा राहिला आहे.
बाजरीचे पौष्टिक महत्त्व
बाजरीत लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हिवाळ्यात ती शरीराचे तापमान संतुलित ठेवते, हाडे मजबूत करते आणि मधुमेह व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते.- अलका कर्णिक,आहारतज्ज्ञ
बाजार चित्र
| धान्य | दर (₹/क्विंटल) | स्थिती |
|---|---|---|
| बाजरी | ३,२०० – ३,४०० | वाढलेले भाव |
| ज्वारी | ३,१०० – ३,५०० | स्थिर |
| हलकी बाजरी | २,५००– ३००० | सामान्य विक्री |
थंडीआधीच बाजरीत गरमी!
यंदा बाजारात बाजरीच्या भावात गरमी निर्माण झाली आहे. आता पुढील काही आठवड्यांत थंडी वाढली की, बाजरीच्या मागणीत आणखी भर पडेल. त्यामुळे भाव आणखी चढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maize Market : हमीभाव फक्त नावालाच; 'या' बाजारात मक्याचे दर घसरले वाचा सविस्तर
Web Summary : Bajra prices are soaring, nearing those of Jowar due to reduced production from late rains. Farmers are pleased as prices reach ₹3,400 per quintal, driven by demand for quality grains. This surge may impact the affordability of staple foods.
Web Summary : देर से हुई बारिश के कारण उत्पादन घटने से बाजरा की कीमतें बढ़ रही हैं, जो ज्वार के करीब पहुंच गई हैं। गुणवत्तापूर्ण अनाज की मांग से किसानों को 3,400 रुपये प्रति क्विंटल तक दाम मिलने से खुशी है। इस उछाल से मुख्य खाद्य पदार्थों की वहनीयता प्रभावित हो सकती है।