Join us

March End : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 'या' तारखेपर्यंत लिलाव बंद, जाणून घ्या कारण? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 3:04 PM

....म्हणून काही निवडक बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या मार्च एन्ड सुरु असल्याने अनेक शासकीय, निमशासकीय संस्थांची कामे सुरु असतात. या कालावधीत वर्षाअखेरची कामे असल्याने मार्च एन्ड धावपळीचा असतो. याच पार्श्वभूमीवर बाजार समित्यामध्ये देखील लिलाव बंद ठेवण्यात येत आहेत. याच लासलगाव आणि लासलगाव विंचुर बाजार समितीचा समावेश आहे. या बाजार समित्यामध्ये कांदा लिलाव वगळता इतर लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. 

31 मार्चपर्यंत आर्थिक वर्ष म्ह्णून गणले जाते. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसात आर्थिक गणिते जुळविणारी सगळी कामे केली जातात. तसेच बँकांची कामे देखील सुरु असल्याने अशा स्थितीत व्यवहार करणे शक्य होत नाही. म्हणून काही निवडक बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवार दिनांक 01 एप्रिलपर्यंत वर्षअखेर असल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारावरील धान्य, भुसार व तेलबिया या शेतमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र कांदा लिलाव सुरु राहतील याची दक्षता घेण्याची सूचना देखील प्रशासनाने केली आहे. 

त्याचबरोबर लासलगाव बाजार समितीत अंतर्गत येणाऱ्या लासलगाव विंचूर बाजार समिती प्रशासनाने देखील  आवाहन केले आहे. त्यानुसार सर्व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की, आज शुक्रवार 29 मार्च रोजी. विंचूर उपबाजार आवारा वरील कांदा लिलाव हे दिवस भर सुरू राहातील. धान्य लिलाव हे फक्त सकाळच्या सत्रात होतील. दुपारच्या सत्रातील धान्य लिलाव हे बंद राहातील याची सर्व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी.

तसेच उदया शनिवार दि. 30 मार्च रोजी. कांदा लिलाव हे पूर्ण दिवस चालु राहातील व धान्य लिलाव बंद राहातील. तसेच रविवार 31 मार्च रोजी ते 02 एप्रिलपर्यंत मार्च वर्षाअखेर असल्याने कांदा व धान्य लिलाव हे बंद राहतील याची सर्व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी. आणि त्यानंतर 03 एप्रिलपासून कांदा व धान्य लिलाव हे पूर्ववत सुरू राहातील, असेही सांगण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधावा , असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदाअर्थव्यवस्थाशेतकरी