गोंदिया : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी विपणन हंगाम २०२५-२६ मधील मका विक्री करण्यासाठी शासनाचे अधिकृत बीम (BEAM) पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी १ ते ३० एप्रिल या कालावधीत करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
तसेच, मका विक्रीसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन, नऊ अतिरिक्त मका खरेदी केंद्रे वाढविण्यात आली असून, पूर्वीच्या आठ केंद्रांसह एकूण १७ मका खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये, गोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. गोरेगाव, माँ वैष्णवी महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्या. गिरोला अंतर्गत गिरोला हेटी (ता. सडक अर्जुनी), गहाणे शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्या. फुटाळा (ता. सडक अर्जुनी), दि महिला औद्योगिक उ. सहकारी संस्था मर्या. सडक अर्जुनी अंतर्गत भादुटोला, प्रियंका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या.
डुंडा-पांढरी अंतर्गत गॉगले (ता. सडक अर्जुनी), वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभि. बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्या. कोकणा-जमी अंतर्गत पिपरी (ता. सडक अर्जुनी), गणेश अटल अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या. सिरेगावबांध (ता. अर्जुनी मोरगाव), कृषक शेतकी उ.सा.सा.पु त खरेदी विक्री सहकारी संस्था मर्या. भिवखिडकी (ता. अर्जुनी मोरगाव), विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. अर्जुनी मोरगाव (विविध) येथे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे जिल्ह्यातील सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसह जसे, रब्बी पणन हंगाम २०२५-२६ चा पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन ७-१२ उतारा व नमुना ८, आधार कार्ड, बैंक पासबुक, मोबाईल नंबर, सामूहिक १२ उतारे असल्यास उताऱ्यावरील इतर व्यक्तींचे सहमती पत्र व आधार कार्ड इत्यादीसह केंद्रांवर जाऊन ३० एप्रिलपर्यंत नोंदणी पूर्ण करावी आणि शासकीय मका खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
Web Summary : Gondia farmers must register online by April 30th to sell maize. Nine additional purchase centers approved, totaling seventeen. Required documents include 7/12 extract, Aadhar, and bank passbook.
Web Summary : गोंदिया के किसानों को मक्का बेचने के लिए 30 अप्रैल तक ऑनलाइन पंजीकरण करना होगा। नौ अतिरिक्त खरीद केंद्र स्वीकृत, कुल सत्रह। आवश्यक दस्तावेजों में 7/12 अर्क, आधार और बैंक पासबुक शामिल हैं।