Join us
Daily Top 2Weekly Top 5

Amla Market : हिवाळा सुरू, आवळा बाजारात दाखल; भाव किती आहेत? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:19 IST

Amla Market : हिवाळ्याची थंडी वाढताच बाजारात तुरट आवळ्यांचा हंगाम सुरू झाला असून त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे मागणीत मोठी वाढ झाली आहे. व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले आवळे सध्या आरोग्य जागरूक नागरिकांची पहिली पसंती ठरत आहेत. (Amla Market)

Amla Market : हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात हिरवेगार, आंबट-गोड आवळे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले असून त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. (Amla Market)

केस, त्वचा, पचनसंस्था तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त असलेला आवळा सध्या ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीस उपलब्ध आहे. (Amla Market)

थंडीच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेणाऱ्या नागरिकांचा आवळा खरेदीकडे विशेष कल दिसून येत आहे.(Amla Market)

आवळा कच्चा खाणे सर्वांनाच जमत नसले तरी त्याचे लोणचे, सरबत, चटणी, आवळा कढी, हनी शॉट्स अशा विविध प्रकारांत सेवन केले जाते. त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये आवळ्याचा वापर वाढला आहे. (Amla Market)

कोरोनानंतर आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने आवळ्याच्या सेवनात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.(Amla Market)

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी, अँटीऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्स आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात. (Amla Market)

यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, थकवा यांसारख्या तक्रारींपासून संरक्षण मिळते. 

तज्ज्ञांच्या मते, आवळ्याचे नियमित सेवन केल्यास हिवाळ्यातील आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

मधुमेह व डोळ्यांसाठी लाभदायक

आवळ्यातील सोल्यूबल फायबरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठी आवळा विशेष लाभदायक मानला जातो. 

तसेच व्हिटॅमिन-ए मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि वयोमानानुसार होणाऱ्या मॅक्युलर डिजेनेरेशनसारख्या दृष्टीविकारांचा धोका कमी होतो.

पचनासाठी गुणकारी

पचनसंस्थेच्या दृष्टीनेही आवळा अत्यंत उपयुक्त आहे. बद्धकोष्ठता, अपचन तसेच इरिटेबल बोवेल सिंड्रोमसारख्या तक्रारींवर आवळ्याचे नियमित सेवन फायदेशीर ठरते. 

व्हिटॅमिन-सीमुळे शरीरातील इतर पोषक घटकांचे शोषणही अधिक चांगल्या प्रकारे होते. याशिवाय आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

हिवाळ्यात कोणत्याही स्वरूपात आवळ्याचे नियमित सेवन केल्यास आरोग्य सुदृढ राहते, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आगामी काळातही बाजारात आवळ्याची मागणी कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा सविस्तर :   New Safflower Varieties : करडई पिकाला नवसंजीवनी; वनामकृविच्या वाणांना केंद्राची मंजुरी

अधिक वाचा : E Peek Pahani : शेतकऱ्यांनो, आजच करा ई-पीक पाहणी; अन्यथा मदत मिळणार नाही!

 

English
हिंदी सारांश
Web Title : Amla Arrives in Market: Price and Health Benefits Detailed

Web Summary : Winter's arrival brings fresh Amla to market, priced at ₹60-80/kg. Rich in Vitamin C and antioxidants, Amla boosts immunity, aids digestion, and benefits diabetics. Available in diverse forms, demand is rising post-COVID for its health benefits.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारफळेशेतकरी