Join us

Agriculture News : खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत तांदूळ विक्री, खरेदीदारांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 21:57 IST

Agriculture News : भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) प्रादेशिक महाराष्ट्र कार्यालयाने खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत देशांतर्गत तांदूळ विक्रीची (bulk Rice) घोषणा केली आहे.

Agriculture News :भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) प्रादेशिक महाराष्ट्र कार्यालयाने खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत देशांतर्गत तांदूळ विक्रीची (bulk Rice) घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून, खरेदीदार भारतीय अन्न महामंडळाच्या ई- लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. याबाबतचे टेंडर आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

भारतीय अन्न महामंडळ गोवा (Food Corporation Of India) राज्यातून 500 मेट्रिक टन (मेट्रिक टन) तांदूळ विक्रीसाठी ठेवला जाणार आहे. येत्या 27 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी हे टेंडर काढण्यात आले आहे. बोलीसाठी किमान प्रमाण 1 मेट्रिक टन आहे आणि प्रति बोलीदार कमाल प्रमाण 2000 मेट्रिक टन आहे. या खुली बाजार विक्री योजनेमुळे तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी आशा भारतीय अन्न महामंडळाकडून करण्यात आली आहे. 

दरम्यान तांदूळ साठा खरेदी करण्यात स्वारस्य असलेले व्यापारी, घाऊक  खरेदीदार आणि तांदूळ उत्पादक  https://www.valuejunction.in/fci/ या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. या पॅनेल प्रक्रियेला 72 तासांचा कालावधी लागतो. अधिक माहितीसाठी 1800 102 7136 या नंबरवर संपर्क साधू शकता. 

अशी करा नोंदणी 

  • भारतीय अन्न महामंडळाच्या https://www.valuejunction.in/fci/ वेबसाईटवर जायचं आहे. 
  • यानंतर User Login येथील Registration for Empanelment या पर्यायावर क्लिक करा. 
  • यानंतर firm डिटेल्स व्यवस्थित भरा. जसे फर्मचे नाव, पत्ता, राज्य, शहर इत्यादींसह संपर्कासाठीची माहिती भरा. 
  • पुढील तांदूळ किंवा गहू यातील एका पर्यायावर क्लिक करा. 
  • त्यानंतर पॅन नंबरसह बँकेची माहिती भरा
  • शेवटी व्हेरिफिकेशन कोड टाकून नेक्स्ट वर क्लिक करा. 

 

Kanda Bajarbhav : सोलापुर बाजारात आवक घसरली, दरात सुधारणा, वाचा आजचे कांदा बाजारभाव

 

टॅग्स :भातकृषी योजनाशेती क्षेत्रशेती