Gahu Kharedi : सौदी अरेबियाची मुख्य सरकारी खरेदी संस्था, जनरल फूड सिक्युरिटी अथॉरिटी (GFSA) ने सोमवारी आंतरराष्ट्रीय निविदेत सुमारे ७९४,००० मेट्रिक टन गहू खरेदी केला. विशेष म्हणजे या संस्थेचे निविदा प्रक्रिया काढली होती, यामध्ये ६ लाख ५५ हजार टन खरेदी नमूद होती, मात्र त्याहीपेक्षा अधिक गव्हाची खरेदी झाली आहे.
GFSA ने अहवाल दिला की, सौदी अरेबियाने जवळपास १३ खेपामध्ये पाठवला जाणार आहे. मे ते जुलै दरम्यान सौदी अरेबियाला पोहोचवण्यासाठी गहू खरेदी करण्यात आला होता. सुरुवातीला किंमत जाहीर करण्यात आली नव्हती. खरेदी केलेल्या खेपांमध्ये जेद्दाह बंदराला पाच, यानबूला पाच, जाझानला दोन आणि दुबईला एक खेप समाविष्ट होती.
निर्यात मंजुरीचा परिणामकेंद्र सरकारने नुकतीच २५ लाख टन गहू निर्यातीला मंजुरी दिली आहे. देशांतर्गत साठा पुरेसा असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP - २५८५ रुपये) अधिक भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे घाऊक बाजारात दरात स्थिरता असून, भाव पडण्याची भीती दूर झाली आहे.
आडत बाजारात स्थिती?सध्या घाऊक बाजारात गव्हाचा सरासरी दर २,६०० ते २,८०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे.लोकवन : २,६०० ते २,६५० रुपये.चंदोसी : ३००० ते ३१०० रुपये,१४७ गहू : २७०० ते ३००० रुपये.२१९८ गहू: २७०० ते २८०० रुपये.ज्या गव्हाची प्रतवारी गहू मशिन क्लीन आहे, अशा गव्हाला ३,३०० रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळत आहे.
आजचे बाजारभाव पाहुयात
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
|---|---|---|---|---|---|---|
| 04/03/2026 | ||||||
| कोल्हापूर -लश्र्मीपूरी | --- | क्विंटल | 252 | 2500 | 5000 | 3750 |
| तुळजापूर | --- | क्विंटल | 158 | 2100 | 2400 | 2300 |
| जळगाव - मसावत | १४७ | क्विंटल | 48 | 2400 | 2400 | 2400 |
| अकोला | लोकल | क्विंटल | 366 | 2000 | 2400 | 2235 |
| मुंबई | लोकल | क्विंटल | 11949 | 2900 | 5000 | 3950 |
| उल्हासनगर | लोकल | क्विंटल | 490 | 3000 | 3400 | 3200 |
| पुणे | शरबती | क्विंटल | 502 | 4000 | 5000 | 4500 |
| कल्याण | शरबती | क्विंटल | 3 | 2800 | 3600 | 3200 |
Web Summary : Saudi Arabia purchased 794,000 tons of wheat. India's export approval boosts farmer prospects, exceeding MSP. Wholesale prices range from ₹2,600-₹2,800/quintal, with top quality reaching ₹3,300.
Web Summary : सऊदी अरब ने 7 लाख 94 हजार टन गेहूं खरीदा। भारत की निर्यात मंजूरी से किसानों को एमएसपी से अधिक लाभ की उम्मीद। थोक मूल्य ₹2,600-₹2,800/क्विंटल है, उच्च गुणवत्ता ₹3,300 तक।