Join us

Onion Market : आज उन्हाळ कांद्याला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 7:59 PM

आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 78 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1 लाख 41 हजार क्विंटलकही आवक झाली. यात सर्वाधिक उन्हाळ कांद्याची 1 लाख क्विंटलहुन अधिक आवक झाली. आज कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1800 रुपयांचा दर मिळाला. आज देखील नाशिक जिल्ह्यात 78 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.

आज 11 मे 2024 पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. कराड बाजार समितीत हलवा कांद्याला सरासरी 1800 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 16 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. तर या बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी केवळ 1000 रुपये दर मिळाला. तर  अमरावती फळ-भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी 1300 रुपये, धुळे बाजारात 1360 रुपये, नागपूर बाजारात 1375 रुपये तर जळगाव बाजार समितीत केवळ 900 रुपये दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला येवला बाजार समितीत 1550 रुपये, नाशिक बाजार समितीत सरासरी 1300 रुपये तर लासलगाव बाजार समितीत सरासरी 1500 रुपये दर मिळाला. तर लासलगाव विंचूर बाजार समितीत सर्वाधिक 1750 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे दर

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/05/2024
कोल्हापूर---क्विंटल555470022001400
जालना---क्विंटल10222501600800
अकोला---क्विंटल84280014001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल26513501450875
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल345130017501500
कराडहालवाक्विंटल15050018001800
सोलापूरलालक्विंटल1673810020001000
बारामतीलालक्विंटल167630017001200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल51960020001300
धुळेलालक्विंटल91320015501360
जळगावलालक्विंटल7494001425900
धाराशिवलालक्विंटल13100016001300
नागपूरलालक्विंटल1800100015001375
पेनलालक्विंटल315200022002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल481660018501225
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल990018001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल4155001200850
वडगाव पेठलोकलक्विंटल180160018001700
वाईलोकलक्विंटल15100019001500
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
येवलाउन्हाळीक्विंटल400030018491550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100020013991300
नाशिकउन्हाळीक्विंटल880570016001300
लासलगावउन्हाळीक्विंटल80750020011500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल400070020001650
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1600080021601750
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल82850017151575
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल24641001700900
चांदवडउन्हाळीक्विंटल820040020461500
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल203642001800900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2950050021301550
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल534050016401400
टॅग्स :कांदाशेतीमार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक