'आवळा देऊन कोहळा काढला', अशी म्हण प्रचलित असली तरी हा कोहळा अमावास्या येताच बाजारात चांगलाच भाव खातो. घरात आणि व्यवसायात मुख्य दरवाजावर कोहळा बांधल्यास येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोषांपासून संरक्षण होते, अशी धारणा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.
त्यामुळे शनिवार, अमावास्या किंवा पौर्णिमा येताच बाजारात कोहळे विक्रीसाठी येतात अन् भाव खाऊन जातात.
कोहळा मुख्य दरवाजावर, लाल वस्त्रात गुंडाळून आणि तीन गाठी मारून शनिवारी, अमावास्येला किंवा पौर्णिमेला सूर्यास्तानंतर बांधला जातो. घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करतो, असे मानले जाते.
२० ऑक्टोबरपासून २१ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी अमावास्या कालावधी असल्याने सोमवारी बीड येथील बाजारात कोहळ्यांची मोठी आवक झाली. आकारानुसार, १०० ते १५० रुपयांना कोहळे विकले जात होते. ग्राहकही ते खरेदी करत होते.
राज्याच्या विविध बाजारातील कोहळा आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
20/10/2025 | ||||||
पुणे | लोकल | क्विंटल | 269 | 1500 | 4000 | 2750 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 140 | 1500 | 2000 | 1875 |
कामठी | लोकल | क्विंटल | 1 | 1510 | 2010 | 1760 |
हिंगणा | लोकल | क्विंटल | 2 | 2000 | 2500 | 2166 |
19/10/2025 | ||||||
रामटेक | --- | क्विंटल | 1 | 800 | 1000 | 900 |
पुणे | लोकल | क्विंटल | 438 | 800 | 3500 | 2150 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 120 | 1000 | 2000 | 1875 |
कामठी | लोकल | क्विंटल | 3 | 1520 | 2020 | 1770 |
हेही वाचा : एमपीएससी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट; दोन एकर अद्रक शेतीतून कमावले १५ लाख