Join us

Kanda Market : पारनेर बाजार समितीत कांदा दरात सुधारणा; नंबर १ कांद्याला कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:09 IST

बाजार समितीत रविवारी २२ हजार २८० कांदा गोण्यांची आवक झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेकांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवला आहे.

पारनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी (१७ ऑगस्ट) झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या २२ कांदा गोण्यांना २२००, तर २६ गोण्यांना २१०० रुपये क्विंटल दर मिळाला.

लिलावात कांद्याला २० ते २१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्याची माहिती सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी दिली. कांद्याच्या भावात वाढ झाल्याने कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले.

बाजार समितीत रविवारी २२ हजार २८० कांदा गोण्यांची आवक झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेकांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवला आहे.

रविवारच्या लिलावात कांद्याच्या भावात वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला. लिलावात ५ ते १० वक्कलला २ हजार ते २१०० रुपये भाव मिळाला.

तर एक नंबरला १७०० ते १९००, दोन नंबरला १५०० ते १६००, तर ३ नंबरला १२०० ते १४०० रुपये, चार नंबर कांद्यास ३०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

तीन दिवस कांदा लिलाव◼️ पारनेर बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रविवारी, बुधवारी व शुक्रवारी असे आठवड्यातील ३ दिवस कांदा लिलाव केले जात असल्याची माहिती उपसभापती किसनराव सुपेकर यांनी दिली.◼️ शेतावर कांदा विक्री न करता, बाजार समितीत करण्याचे आवाहन संचालक शंकर नगरे, बाबासाहेब तरटे, अशोक सावंत, बापूराव शिर्के, डॉ. पद्मजा पठारे यांनी केले.

अधिक वाचा: शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार; लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपारनेर