Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:25 IST

kanda market चाकण बाजारात कांद्याची एकूण ६,००० क्विंटल आवक होती. मागच्या आठवड्याच्या तुलनेत आवक १,००० क्विंटलने वाढली.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणमधील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये भोगी आणि मकर संक्रांतीमुळे गाजराची मोठ्या प्रमाणात आवक झाली.

तर वटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा, आलं, वालवड, बटाटा आणि लसणाची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली.

चाकण येथील पालेभाज्यांचा बाजारात मेथी, कोथिंबीर आणि पालक यांची विक्रमी आवक झाली, ज्यामुळे त्यांच्या किमती खाली आल्या. या बाजारातील एकूण उलाढाल ६ कोटी ७० लाख रुपये झाली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण ६,००० क्विंटल आवक होती. मागच्या आठवड्याच्या तुलनेत आवक १,००० क्विंटलने वाढली; परंतु कांद्याचा कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिरावला.

बटाट्याची एकूण आवक २,००० क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक १,००० क्विंटलने कमी झाली, तरीही बटाट्याचा कमाल भाव १,५०० रुपयांवर स्थिरावला.

लसणाची एकूण आवक ५० क्विंटल होती. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक ३० क्विंटलने वाढली, तरीही लसणाचे भाव ८,००० रुपयांवरून १२,००० रुपयांवर पोहोचले.

हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ५,००० ते ६,००० रुपयांपर्यतचा भाव मिळाला.

अधिक वाचा: मंगळवेढ्याची मालदांडी थेट लंडनला रवाना; अवघ्या २० किलो ज्वारीसाठी केले १८ हजार रुपये खर्च

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Arrival Increased, Rate Steady Compared to Last Week

Web Summary : Chakan market saw increased onion arrival, reaching 6,000 quintals. Despite a rise from last week, prices remained steady at ₹2,000. Garlic prices soared, while potato arrival decreased. Green chillies fetched ₹5,000-₹6,000.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डचाकणपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीखेडमकर संक्रांतीबटाटामिरची