Join us

Kanda Bajarbhav : भुसावळ बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 17:43 IST

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये 764 क्विंटल कांद्याची आवक झाली. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने आवक कमी झाली आहे.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये 764 क्विंटल कांद्याची (Kanda Market) आवक झाली. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने आवक कमी झाले आहे. उद्यापासून बाजार समिती पुरवत होतील त्यानंतर आवक वाढतील अशी अपेक्षा आहे.

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रोजी भुसावळ बाजारात लाल कांद्याची (Bhusaval Kanda Market) 25 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 2500 रुपये तर सरासरी 2800 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची 540 क्विंटलचे आवक होऊन कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 3450 रुपये दर मिळाला. 

तर पुणे खडकी बाजारात कमीत कमी 1700 रुपये आणि सरासरी 2650 दर मिळाला. पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी 2800 रुपये आणि सरासरी 3800 रुपये दर मिळाला. तर मंगळवेढा बाजारात सरासरी 2410 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती