Join us

Kanda Bajarbhav: घोडेगावला लाल कांदा बाजारात; चार हजाराचा मिळाला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 13:45 IST

Red Onion in Ghodegaon Market: घोडेगाव बाजारात लाल कांदा दाखल होत असून प्रति क्विंटल चार हजार रुपये बाजारभाव मिळाला.

घोडेगाव : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजार आवारात गावरान कांदा भाव स्थिर आहेत. आवारात बुधवारी प्रथमच नवीन लाल कांद्याची आवक झाल्याने कांदा गोण्यांना नारळ वाढवून लिलाव करण्यात आला. येथे या कांद्याला चार हजार रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

घोडेगाव कांदा बुधवारच्या (दि.२५) कांदा लिलावात गावरान कांद्याला सरासरी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये भाव मिळाला. एक दोन लाॅटला पाच हजार ते पाच हजार दोनशेचा भाव मिळाला. या वर्षात प्रथमच पांडुरंग होंडे यांच्या साक्षी ट्रेडिंग कांदा अडतीवर लाल कांद्याची आवक झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, संचालक रमेश मोटे, उपबाजारचे शाखाधिकारी संभाजी पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून कांद्याचा लिलाव करण्यात आला.

बुधवार ३४ हजार १४१ गोण्यांची आवक झाली. यात एक दोन लाॅटला ५००० ते ५२००, मोठा कांदा ४७०० ते ५०००, मुक्कल भारी ४५०० ते ४८००, गोल्टा ४७०० ते ४९००,

गोल्टी ४४०० ते ४७००, हल्का डंकी जोड कांदा २००० ते ३५०० रुपये भाव मिळाला.

टॅग्स :कांदामार्केट यार्डबाजार