गजानन अक्कलवार
काही दिवसांपूर्वी कांदा आणि लसूणला चांगला भाव मिळत होता. परंतु, नजीकच्या काळात नवीन कांदा आणि लसूण निघाल्याने बाजारात आवक वाढली. त्यामुळे भावही कोसळले आहे. (Kanda bajar bhav)
कांदा पिकवून चांगले पैसे मिळतील, या आशेवर असणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्याचे बघायला मिळत आहे. महागडे रोप, खते विकत आणून शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. बेड व वाफे पद्धतीतर पीक घेण्यासाठी मोठा खर्च करण्यात आला. (Kanda bajar bhav)
मोठ्या उमेदीने कांद्याची लागवड करण्यात आली. तसे पाहिले तर कांद्याच्या भावात नेहमी चढ-उतार येत असतात. तेजीच्या काळात ज्यांचा कांदा निघतो, त्यांच्या गाठीशी चार पैसे उरतात. परंतु, मंदीच्या काळात आलेला कांदा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवून जातो. (Kanda bajar bhav)
कारण मंदीच्या काळात कांदा साठवून ठेवतो म्हटले तर यावर मोठा खर्च करावा लागतो. दुसरीकडे भाव वाढेल की नाही, याचाही नेम नसतो. सध्या कांद्याला १० ते १५ रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
भाजीमंडीत मिळणाऱ्या दरातच आज विविध ठिकाणी रस्त्यावर दुकान थाटून बसणाऱ्या विक्रेत्यांकडूनही सारख्याच दरात कांदा उपलब्ध होत आहे. शेतकरीही वाहनांमध्ये कांदा भरून आणत दुकान लावून विक्री करत असल्याचे दिसून येते.
१० ते १५ रुपये किलो दरात मिळतो कांदा
आज ठोक बाजारात कांद्याला १० ते १५ रुपये किलोचा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारामध्ये २५ ते ३० रुपये दराने कांदा उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते.
खते, औषधीचा खर्च जिवाच्या वर
कांदा लागवडीनंतर या पिकांना नियमित विविध प्रकारची महागडी खते द्यावी लागतात. औषधांची फवारणी करावी लागतात. या खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
इंधन, मजुरी, मशागत खर्चात दुप्पटीने वाढ
कांदा पीक घेण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. यासाठी लागणारे इंधन, मजुरी आणि मशागत खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. दुसरीकडे मात्र कांद्याच्या किमतीत मंदी आली आहे.
ढीग करून ठेवल्यास कांद्याचा खराबा
कांदा साठवून ठेवण्यासाठी तांत्रिक पद्धतीचा वापर करावा लागतो. त्याला वरचेवर सोलावे लागते. खराब कांदा काढून फेकावा लागतो. सडलेल्या कांद्याचा वास येत असल्यामुळे दीर्घकाळ साठवून ठेवणेही शक्य नाही.
चांगला भाव मिळेल, या अपेक्षने कांद्याची लागवड केली. आता भाव कोसळले. त्यामुळे खर्च निघेल की नाही, अशी स्थिती आहे. - आनंद जगताप, शेतकरी परसोडी बु.
कांद्याच्या भावात नेहमी चढ-उतार होत असतात. भाव चांगला मिळाला की, चार पैसे उस्तात. परंतु, भाव कोसळले की लावलेला पैसाही निघत नाही. त्यामुळे यावेळी लागवडीकडे दुर्लक्ष झाले. - मुरलीधर एंबडवार, अंतरगाव.