मुखरु बागडे
बहुप्रतीक्षित धान खरेदीचे निर्देश मिळाले. ज्यात भंडारा जिल्ह्याच्या ७ तालुक्यात २२४ आधारभूत केंद्रातून शेतकऱ्यांचे २०२५-२६ करिता आधारभूत मूल्यांतर्गत खरेदीचे आदेश जिल्हाधिकारी सावंत कुमार व पणन अधिकारी यांनी दिले. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी खरेदी केंद्रांनी व पणन कार्यालयाने घेणे गरजेचे आहे.
तब्बल ३०ते ४० दिवसांच्या उशिराने जिल्ह्यात धान खरेदी नोंदणी व खरेदीचे आदेश बुधवार (१९ नोव्हेंबर) ला निघाले. यामुळे निश्चितच दिलासा मिळाला आहे. आधारभूत खरेदी केंद्रधारकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करीत शक्य तितक्या लवकर नोंदणी व मोजणीचे नियोजन करणे गरजेचे आहे. २३६९ दराने खरेदी होणार आहे.
शेतकऱ्यांनी धान खरेदी करिता अर्ज, सातबारा, गावनमुना आठ, आधार कार्ड, अद्यावत बँकेचे पासबुक व खरेदी केंद्रावर नोंदणी करतेवेळी हजर राहणे गरजेचे आहे.
नेटवर्क समस्या...
• ॲपमध्ये नोंदणी करताना नेटवर्क समस्या जाणवत आहे. वरिष्ठ स्तरावरून त्यावर दुरुस्ती किंवा अपडेट राहत खरेदी केंद्रांना सहकार्य करणे गरजेचे आहे. उत्पादनाची टक्केवारी लक्षात घेता जिल्ह्यात प्रतिहेक्टरी ४० क्विंटल खरेदीची मर्यादा देण्यात आली आहे. एफएक्यू अंतर्गत धान खरेदी केली जाईल.
• मात्र पावसामुळे भिजलेल्या धानाची खरेदी करायची की नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कृपया शासनाने यावर तोडगा काढून खरेदी केंद्रांना निर्देश पुरविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी प्रभावित शेतकऱ्यांनी केली आहे. आधारभूत थान खरेदी केंद्रांना किमान पहिल्या टप्प्यात गरजे एवढा बारदाना आवश्यक आहे. बऱ्याच केंद्रात बारदाण्याचा तुटवडा जाणवत आहे.
तालुका स्तरावरील खरेदीचे केंद्र...
तुमसर - २७ पवनी - ४१ भंडारा - २३ मोहाडी - २४ लाखनी - २८ लाखांदूर - ४४ साकोली - ३७
शासनाचे आदेशाने धान खरेदी व नोंदणीचे आदेश भंडारा जिल्ह्यात २२४ केंद्रांना पुरविण्यात आलेले आहेत. तसे पत्रक सुद्धा केंद्रांना दिलेले आहेत. सूचनांची योग्य ती काळजी घेऊन शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा केंद्रांवर काळजी घ्यावी. - संभाजी चंद्रे, पणन अधिकारी भंडारा.
Web Summary : Bhandara district initiates paddy procurement at 224 centers following delayed orders. Farmers must register with necessary documents. Network issues and wet paddy purchase concerns remain. Limited 'bardana' supply poses a challenge. Officials emphasize smooth process for farmers.
Web Summary : भंडारा जिले में देरी से आदेश के बाद 224 केंद्रों पर धान खरीद शुरू। किसानों को आवश्यक दस्तावेजों के साथ पंजीकरण कराना होगा। नेटवर्क समस्याएँ और गीले धान की खरीद चिंताएँ बनी हुई हैं। सीमित 'बारदाना' आपूर्ति एक चुनौती है। अधिकारियों ने किसानों के लिए सुगम प्रक्रिया पर जोर दिया।