Join us

तुरीच्या बाजारभावात वाढ; मिळतोय उच्चांकी भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:04 IST

करमाळा कृषी उत्पन्न बाजार लोकमत न्यूज नेटवर्क समितीमध्ये प्रतिदिनी तुरीचा तोरा वाढतच आहे. शुक्रवारी साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडत तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ५९१ इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

करमाळा : कृषी उत्पन्न बाजार लोकमत न्यूज नेटवर्क समितीमध्ये प्रतिदिनी तुरीचा तोरा वाढतच आहे. शुक्रवारी साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडत तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ५९१ इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

शासन निर्धारित हमीभावापेक्षा जादा दर मिळत असून, शेतकऱ्यांनी आपला तुरीसह अन्य शेतमाल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे. सध्या तुरीची दररोज सर्वसाधारणपणे पाचशे कट्टेच्या घरात आवक होत असून, दर वाढतच आहेत.

तुरीला सरासरी दहा हजार व कमाल साडेदहा हजारांहून अधिक दर मिळत आहे. तुरीसोबतच ज्वारी, हरभरा व मक्क्याचीदेखील आवक आता वाढत आहे. तुरीच्या सरासरी उत्पादनात झालेली घट, तुरीची मागणी यामुळे दरात वाढ झालेली दिसत आहे.

करमाळा बाजार समितीमध्ये सध्या दररोज पन्नास लाखांची उलाढाल होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ओस पडलेल्या करमाळा बाजारपेठेवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती सभापती व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली.

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्डकरमाळापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी