Join us

Onion Market या बाजारसमितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 1:23 PM

केंद्र शासनाने कांदा निर्यातीचे धोरणात तात्पुरता बदल केला असल्यामुळे काही देशात कांदा निर्यात होऊ लागल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी राहिली असून आवक वाढली आहे. 

श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये ६७ साधनातून आवक आली होती. प्रथम श्रेणीच्या कांद्याच्या वक्कलास सर्वाधिक १९०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.

प्रथम श्रेणीचा कांदा १६०० ते १९००, द्वितीय श्रेणीचा कांदा १३०० ते १६००, तृतीय श्रेणीचा कांदा ९०० ते १३०० व गोल्टी कांदा १२०० ते १६०० रुपये प्रती क्विंलटने लिलावात विक्री झाला.

केंद्र शासनाने कांदा निर्यातीचे धोरणात तात्पुरता बदल केला असल्यामुळे काही देशात कांदा निर्यात होऊ लागल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी राहिली असून आवक वाढली आहे. 

केंद्र शासन धोरणात निवडणुकीनंतर पुनश्च बदल करण्याची शक्यता असल्यामुळे कांदा व्यापारी कांदा खरेदी करून रवानगी करीत आहे. कांदा साठवणुकीच्या फंदात पडत नाही.

तर शेतकरी वाढलेले भावाचा फायदा घेत निघालेला कांदा मार्केट मध्ये विक्रीस आणीत आहेत. कांदा व्यापारी आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू राज्यात कांद्याची रवानगी करीत आहे. उच्च प्रतीच्या नंबर १ च्या कांदा निर्यात करणारे व्यापाऱ्यांना पाठवित आहेत.

अधिक वाचा: Fertilizer Price खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डश्रीरामपूरशेतकरीकेंद्र सरकारसरकार