Join us

आज कोणत्या बाजार समितीत कांद्याला किती भाव मिळाला?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: October 9, 2023 19:30 IST

जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव..

आज दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी लासलगाव बाजार समितीत १० हजार ३६८ क्विंटल कांद्याची आवक झाली.  किमान १००० ते २३८० रुपये प्रति क्विंटलने कांद्याला भाव मिळाला. तसेच लासलगाव विंचूर बाजार समितीत ५५०० क्विंटल कांद्याची आवक झाली.हा कांदा २२७५ रुपये प्रतिक्विंटल सरासरी भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरच्या बाजारसमितीत आज एकूण २५४८ क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला ७००- २२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

 दरम्यान, काल आवक वाढूनही मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. दहा किलोस कांद्याला तीनशे रुपये भाव मिळाला आहे. दीड महिन्यानंतर तीनशे रुपये टप्पा ओलांडला आहे. कांद्याचे निर्यात शुल्क वाढल्याने बाजारभाव कमी झाले होते. दिवसेंदिवस कमी होणाऱ्या बाजारभावामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली होती. 

जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरी