Join us

Hapus Mango Bajar Bhav : सोलापुरामध्ये केरळी हापूसचे आगमन; कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:01 IST

सोलापूर शहराच्या बाजारात केरळ हापूस आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून, सध्या त्याची किंमत ६०० रुपये डझन आहे.

सोलापूर : शहराच्या बाजारातकेरळ हापूस आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून, सध्या त्याची किंमत ६०० रुपये डझन आहे.

थंड हंगामातील सुरुवातीच्या काळात आंब्यांची मागणी हळूहळू वाढत आहे. आंबाप्रेमींसाठी हा आनंदाचा विषय ठरला आहे. या आंब्याची गुणवत्ता उत्तम असून, त्यांचा रंग आणि चवही लोकांना खूप आवडत आहे.

केरळी हापूस त्यांच्या विशिष्ट चवीसाठी ओळखले जातात म्हणून त्यांची मागणी वाढत असल्याचे फळविक्रेते फरीद शेख यांनी सांगितले. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, केरळ हापूस आंब्याची गुणवत्ता आणि चव ग्राहकांना आकर्षित करत आहे.

हंगामापूर्वीच आंबे६०० रुपये डझन दरात लक्ष्मी मंडईत विक्री सोलापूरमध्ये आंब्यांचा हंगाम साधारणतः एप्रिल ते जून या कालावधीत असतो, आणि या काळात स्थानिक बाजारात विविध प्रकारचे आंबे उपलब्ध होतात. सध्या बाजारात लोकल आंब्याची आवक सुरू झाली आहे.

टॅग्स :आंबासोलापूरबाजारमार्केट यार्डकेरळ