Join us

Garlic Market : हिवाळ्याच्या दिवसांत लसणाला ड्रायफ्रूटचा भाव; दर आणखी वाढणार का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 10:53 IST

Garlic Market Rate Update : किरकोळ बाजारात सध्या लसणाचा भाव ४०० ते ४५० रुपये प्रति किलोपर्यंत जावून पोहोचला आहे. येणाऱ्या काळात हा भाव आणखी वाढून ५०० ते ६०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज लसूण विक्रेत्यांनी वर्तविला आहे. परिणामतः लसणाचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे.

किरकोळ बाजारात सध्या लसणाचा भाव ४०० ते ४५० रुपये प्रति किलोपर्यंत जावून पोहोचला आहे. येणाऱ्या काळात हा भाव आणखी वाढून ५०० ते ६०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज लसूण विक्रेत्यांनी वर्तविला आहे. परिणामतः लसणाचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील शेतकरी वर्षभर घरी लागेल या प्रमाणात लसूण लागवड करतात. आता काही शेतकरी लसूण लागवडीकडे वळला आहे. यंदा लसूण लागवडीपेक्षा कांद्याची लागवड जास्त प्रमाणात पहावयास मिळत आहे. आता कांदा लागवड वाढली आणि लसणाची आवक घटली आहे.

लसणाचे मोठे उत्पादन घेणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये पाऊस अधिक झाला. परिणामी पिके वाया गेल्याने आवक घटली असल्याचे बोलले जात आहे.

का वाढलेत दर?

बाजारात मागणीच्या तुलनेत लसणाची आवक कमी होत असल्याने उच्चांकी दर मिळत आहे. पावसामुळे आवक कमी झाली तर जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लसणाचा नवीन हंगाम सुरू होतो. नर्व पीक बाजारात येईपर्यंत लसणाची भाववाढ अशीच सुरु राहू शकते. नवीन लसूण बाजारात दाखल झाल्यानंतर दर कमी होतील.

पेस्टचा वापर वाढला

फोडणीसाठी लसणाऐवजी विविध कंपन्यांच्या तयार लसूण पेस्टचा पर्याय गृहिणींनी अवलंबला आहे. ही तयार पेस्ट पाच ते दहा रुपयांपासून बाजारात उपलब्ध असल्याने ती परवडणारी पेस्ट घेण्याकडे गृहिणींचा कल आहे. लसूण महागला म्हणून या पेस्टचा पर्यायी वापर केला जात आहे.

असे आहेत लसणाचे दर

३० नोव्हेंबर रोजी कुरुंद्याच्या आठवडी बाजारात ४०० ते ४५० प्रति किलो लसूण विक्री झाला. नांदेडच्या बिटात लसणाची आवक कमी झाली असून परिणामी दरही वाढले आहेत. नांदेड येथील बाजारातून लसूण तालुक्यात विक्रीसाठी येत आहे. - करीम बागवान, व्यापारी.

हेही वाचा : Russell's Viper : घोणस या अतिविषारी सर्पाचा वावर वाढला; 'अशी' घ्या काळजी

टॅग्स :बाजारभाज्यामार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीअन्न