Lokmat Agro >बाजारहाट > Flower Market: ऐन लग्नसराईत फुल बाजार तेजीत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Flower Market: ऐन लग्नसराईत फुल बाजार तेजीत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Flower Market: The flower market is booming during the wedding season; Read in detail how to get the best price | Flower Market: ऐन लग्नसराईत फुल बाजार तेजीत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Flower Market: ऐन लग्नसराईत फुल बाजार तेजीत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Flower Market: एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई (wedding season) यामुळे फुलांच्या किंमती दुपटीने वाढलेल्या दिसून येत आहेत. वाचा सविस्तर (flower market)

Flower Market: एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई (wedding season) यामुळे फुलांच्या किंमती दुपटीने वाढलेल्या दिसून येत आहेत. वाचा सविस्तर (flower market)

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर

एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई (wedding season) यामुळे फुलांच्या किंमती दुपटीने वाढलेल्या दिसून येत आहेत. बाजारात आधी ७० ते ८० रुपयांना मिळणारा गुलाब आता दीडशे रुपयांवर पोहोचलाय, तर निशिगंध, जिप्सी, जरबेरा, शेवंती या फुलांच्या किमतीही सध्या दुपटीने वाढल्या आहेत. (flower market)

शेतकऱ्यांना आता फुलबागांना जोपसणे मोठे जिकरीचे झाले आहे. फुलाच्या बागांना जास्त पाणी लागते. सध्या उन्हाची वाढलेली तीव्रता पाहता फुलबागांना पुरेसे पाणी मिळत नाही.उन्हामुळे फुले खराब होण्याची शक्यता जास्त असते. परंतु बाजारात सध्या मागणी असल्याने फुलांना चांगला भाव मिळत आहे. (flower market)

ऐन लग्नसरईच्या काळातच फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील मुकुंदवाडी, गुलमंडी, पैठणगेट येथील बाजारात फुलांची आवक कमी झालेली आहे.

बाजारात यापूर्वी ३० रुपयांना मिळणारा झेंडूच्या फुलांचा हार आता ५० रुपयांना विकला जातोय, फूल विक्रेते शकील पठाण म्हणाले, पूर्वी एका दिवसाला ३० ते ४० पर्यंत फुलांचे हार विकले जात होते. (flower market)

सध्या केवळ १५ ते २० हार विकले जात आहेत. तसेच, उन्हामुळे फुले, हार खराब होत आहेत. आम्हाला नुकसान सोसावे लागत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दिल्लीवरून आले हायड्रॅजिया

* सध्या बाजारात हायड्रॅजिया आणि लिलियम ही दुर्मीळ फुले पाहायला मिळत आहेत. ही दोन्ही प्रकारची फुले खास दिल्लीवरून मागवण्यात आली आहेत.

* शहरातील एका विशेष कार्यक्रमात सजावटीसाठी या फुलांची मागणी करण्यात आली होती. हायड्रॅजिया या एका फुलाच्या गुच्छाची किंमत ही ८०० रुपये आहे, तर जांभळ्या लिलियमची किंमत १२०० आहे.

यामुळे वाढले दर

१५ दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने त्याचा फुलांवर परिणाम झाला आहे. वातावरणातील बदलामुळे फुलांवर देखील रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे फुलांची तोडणी करणे मुश्किल झाले होते. सध्या लग्नसराई मोठ्या उत्साहात पार पडत आहे. त्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे.

उन्हामुळे फुलांच्या विक्रीवर २० ते ३० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला आहे. फुलांचे हार जयंत्या, विशेष कार्यक्रम, सणावारांसाठी खरेदी होत असतात. मात्र, दर दुप्पट झाल्यामुळे सामान्य नागरिकांकडून फुलांची खरेदी करताना हात आखडता घेतला जात आहे. कार्यक्रम, लग्नात मागणी कायम आहे. - रतन जाणा, विक्रेता

उन्हाचा परिणाम फुलांच्या विक्रीवर

फुलांचे नावपूर्वीचे दरसध्याचे दर
गुलाब७० ते ८० रुपये१५० रुपये
निशिगंध१५० रुपये३०० रुपये
जिप्सी१५० रुपये४०० रुपये
जरबेरा४० रुपये८० रुपये
शेवंती२०० रुपये३५० रुपये

हे ही वाचा सविस्तर : Natural farming: नैसर्गिक शेतीसाठी 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Flower Market: The flower market is booming during the wedding season; Read in detail how to get the best price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.