Join us

महाराष्ट्रात ९० लाख टन साखर उत्पादन अपेक्षित, इतर राज्यांची काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 09:11 IST

इथेनॉल निर्मितीवरील बंदीचा परिणाम

चालू ऊस गाळप हंगामाअखेर महाराष्ट्रातील साखर उत्पादन ९० लाख टनांवर जाण्याची अपेक्षा आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंधन आणल्यामुळे ३०५ लाख टन नवी साखर देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

डिसेंबर महाराष्ट्रातील २०२३ १९५ अखेर साखर कारखान्यांनी ४२७ लाख टन ऊस गाळप करून ३८.२० लाख टन नव्या साखरेच्या उत्पादनासह देशात पहिला क्रमांक कायम राखला आहे, तर देशभरातील ५११ साखर कारखान्यांनी आतापर्यंत १२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टन नव्या साखरेचे उत्पादन केले आहे. त्यात महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश ३४.६५ लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर २४ लाख टनांसह कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी मंगळवारी दिली. सरासरी साखर उताऱ्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश (९.६५टक्के), कर्नाटक (९.१० टक्के), गुजरात (९ टक्के) आणि महाराष्ट्र (८.९५ टक्के) अशी क्रमवारी आहे.

उत्तर प्रदेश अग्रेसर...

चालू हंगामाअखेर उत्तर प्रदेशात ११५ लाख टन, महाराष्ट्रात ९० लाख टन, कर्नाटकात ४२ लाख टन, तामिळनाडूमध्ये १२ लाख टन, गुजरातमध्ये १० लाख टन आणि सर्व राज्ये मिळून ३०५ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.

हंगामाच्या सुरुवातीला २९० लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज होता. त्यात १५ लाख टन वाढ होण्याची अपेक्षा असून त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेले निबंध शिथिल होऊ शकतात, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :साखर कारखानेऊसमहाराष्ट्र