Join us

दशहरी, लंगडा आंब्याचा हंगाम बहरला; वाचा कोणता आंबा खातोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:41 IST

Mango Market Update : केशरी-पिवळसर गर, लांबट-गोल आकार, चवीला गोड असलेल्या दशहरी, लंगडा, चौसा या आंब्यांचा हंगाम सध्या पुणे मार्केटयार्ड बाजारात बहरला आहे.

केशरी-पिवळसर गर, लांबट-गोल आकार, चवीला गोड असलेल्या दशहरी, लंगडा, चौसा या आंब्यांचा हंगाम सध्या पुणे मार्केटयार्ड बाजारात बहरला आहे.

उत्तर प्रदेशातून या आंब्यांची आवक वाढली असून, या आंब्यांनाही ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. किरकोळ बाजारात दशहरी, लंगडा आंब्याला दर्जानुसार प्रति किलो ६० ते ८० रुपये तर चौसा आंब्याची १३० ते १५० रुपये दराने विक्री केली जात आहे.

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात उत्तर प्रदेशातून दररोज पाच आणि दहा किलोचे सुमारे ८ ते १० हजार बॉक्स तर सुट्टे ५०० क्रेट इतकी या आंब्याची आवक होत आहे.

लखनऊहून मलिहाबाद, शाहरंगपूर येथून दशहरी आंब्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात पाच किलोच्या एका बॉक्सला ३०० ते ३५० रुपये, दहा किलोच्या एका बॉक्सला ४५० ते ५५० रुपये भाव मिळत आहे तर किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये दराने विक्री होत आहे. मलिहाबाद येथून लंगडा आंबा दाखल होत आहे.

घाऊक बाजारात चौसा आंबा प्रति किलोला ३५ ते ४५ रुपये, तर किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. उत्तर प्रदेशातील बनरास येथून चौसा आंब्याची आवक होत असून, घाऊक बाजारात ५ किलोच्या एका बॉक्सला ४०० ते ४५० रुपये भाव मिळत आहे.

उत्तर प्रदेशमधील लखनौ, मलिहाबाद, शाहरंगपूर येथून दशहरी, चौसा आणि लंगडा या आंब्यांची मार्केटमध्ये आवक होत आहे. शहरासह उपनगरातून आंब्याला मागणी असून, सातारा, बारामती, इंदापूर, बिगवान, हुबळी या ठिकाणावरूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. - सुयोग झेंडे, फळांचे आडतदार.

हेही वाचा : 'लिंबोणी'ने दिली आयुष्याला कलाटणी; ३० गुंठ्यांमध्ये रानबा खरातांनी साधली आर्थिक प्रगती

टॅग्स :आंबापुणेमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेती क्षेत्र