Join us

परराज्यातील माल बाजारात आल्याने केळीचा भाव उतरला; कसा सुरु आहे बाजरभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 2:50 PM

आंध्र प्रदेशातील केळीचा हंगाम सुरू झाल्याने मागील आठ दिवसांपासून निर्यातक्षम केळीचे दर आठ ते दहा रुपयांनी घसरले आहेत. सध्या निर्यातक्षम केळीला २२ रुपये तर स्थानिक बाजारात सुपर खोडवा केळीचा शिवार खरेदीचा दर १६ रुपयांपर्यंत मिळत आहे, तर सुपर खोडवा केळीची निर्यात बहुतांश कंपन्यांनी बंद केली आहे.

यंदा केळीचे पीक चांगले आले असताना निर्यातक्षम केळी प्रतिकिलो २९ ते ३२ रुपये व खोडवा केळीचा २५ रुपयांपर्यंत असलेला भाव पंधरा दिवसांतच २२ रुपयांपर्यंत व खोडवा केळीचा १० ते १४ रुपयांपर्यंत खाली आला आहे. परिणामी केळी उत्पादकांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

निर्यातक्षम केळीत प्रतिकिलो १० रुपये व खोडवा केळीत १० ते १५ रुपयांपर्यंत भावात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. वर्षभर पिकाचे संगोपन केल्यानंतर आता केळी काढणीस आली आहे; परंतु दर घसरल्यामुळे शेतकऱ्यात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंध्र प्रदेशातील केळी हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आंध्र प्रदेशात खरेदी करत आहेत. परिणामी, उजनी परिसरातील केळी खरेदीत घट झाली आहे. परिणामी दरात घसरण झाली आहे. - सनी इंगळे, केळी निर्यातदार

केळीला आखाती देशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. व्यापारी एकी करून दर पाडून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. त्यामुळे किमान आधारभूत किमत निश्चित करावी. खरेदी विक्रीच्या व्यवहारांवर बाजार समितीचे नियंत्रण आणावे. केळी फळपिकाला आधारभूत किमत निश्चित करण्यात यावी. - प्रा. शिवाजी बंडगर, माजी सभापती, करमाळा बाजार समिती

टॅग्स :केळीबाजारमार्केट यार्डशेतकरीसोलापूरकरमाळा