डिसेंबरच्या मध्यात थंडीचा पारा चांगलाच वाढला असून, १० अंशाजवळ स्थिरावला आहे. गारठ्यापासून बचाव करण्यासाठी बहुतांश नागरिक गरम कपड्याचा वापर करून शरीर गरम ठेवतात. काही नागरिक शरीर आतून गरम ठेवण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती व वाढवण्यासाठी डिंग लाडूसारखे पौष्टिक पदार्थ आहारात घेतात.
दरम्यान सध्या डिंक लाडूसह सुकामेव्याचे दर मोठ्या प्रमाणात वधारले आहे. तर घराघरांत डिंक लाडू बनवण्यासाठी साहित्य खरेदी सुरू झाली आहे. गतवर्षी ८०० ते १६०० रुपये प्रति किलो असलेले काजू यावर्षी ९०० ते १८०० रुपये प्रति किलो आहेत. बदामदेखील ८०० रुपये ते दर ३००० रुपयांवरून ९०० ते ४००० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. १७०० रुपये ते २००० रुपये प्रति किलो असणारी खसखस यावर्षी २२०० ते ३००० रुपये प्रति किलो आहे.
खोबऱ्याचे भाव मागील वर्षी २५० ते ३०० रुपये किलो इतके होते. या वर्षी ३५० ते ४५० रुपये किलोवर गेले आहेत. थंडीत डिंकासह सुकामेव्यची मागणी वाढते. ठोक बाजारातील दरवाढ झाल्याने किरकोळ विक्रीतही दरवाढ होते, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.
गावरान तुपाचे दरही वाढले
मागील वर्षी १५० ते ४०० रुपये किलो विकली जाणारी खारीक यावर्षी १२० ते ३०० रुपये किलो दराने विकली जात आहे. ८०० रुपये किलो दराने विकले जाणारे गावरान तूप यावर्षी १००० रुपये किलोने विकले जात आहे. यासह इतर काही सुकामेव्याचे दर वाढले आहेत.
...असे आहेत दर (किलोत)
काजू - ९५० ते १८००बदाम - ९५० ते ४०००खसखस - २२०० ते ३०००खोबरे - ३५० ते ४५०खारीक - १२० ते ३००गावरान तूप - ८०० ते १०००डिंक - ४५० ते ६००
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळे महत्त्वाची
थंडीत पौष्टिक राहण्यासाठी आहारात तूप, बदाम, अक्रोड, तीळ, जवस, गूळ, बाजरी आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आवश्यक आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थंडीपासून बचाव होतो, तसेच व्हिटॅमिन सीयुक्त फळे जसे की लिंबूवर्गीय फळे, किवी खाणे फायदेशीर ठरते.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
Web Summary : As temperatures drop, prices of dry fruits and Dink Ladoo surge. Cashews, almonds, and poppy seeds see significant increases. Ghee prices also rise, while dates become cheaper. Demand for immunity-boosting foods increases during winter.
Web Summary : ठंड बढ़ने के साथ सूखे मेवे और डिंक लड्डू के दाम बढ़े। काजू, बादाम और खसखस के दामों में भारी वृद्धि हुई। घी भी महंगा हुआ, जबकि खजूर सस्ते हुए। सर्दियों में रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने वाले खाद्य पदार्थों की मांग बढ़ी।