Join us

यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनालाच देवगड हापूस वाशी बाजारात दाखल; पेटीला मिळणार विक्रमी भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 09:36 IST

Hapus Mango Market या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे.

देवगड : देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ६ डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला सोमवारी रवाना केली आहे.

या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे.

पडवणे गावातील शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते.

योग्य काळजी व फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे पाच पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी त्यांनी २० ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटकडे रवाना केली.

लक्ष्मीपूजनाला विक्रीवाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनीमार्फत ही हापूस आंबा पेटी पाठविण्यात आली असून, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंब्याची विक्री होणार आहे. लक्ष्मीपूजनाला आंबा विकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीच्या दलालांनी सांगितले.

पेटीला विक्रमी भाव मिळेलकोकणातून इतक्या लवकर वाशी मार्केटला हापूस आंब्यांची पेटी रवाना करणारे प्रकाश शिर्सेकर हे पहिलेच बागायतदार ठरले असून, उद्याच्या विक्रीदरम्यान या पेटीला विक्रमी भाव मिळेल, अशी बाजारपेठेत चर्चा आहे.

अधिक वाचा: Fal Pik Vima: आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; पहिल्या टप्यात ७४ कोटी रुपयांचा फळपीक विमा मंजूर

English
हिंदी सारांश
Web Title : Devgad Hapus mango arrives in Vashi market for Diwali Laxmi Pujan.

Web Summary : Devgad's Hapus mangoes reached Vashi market for Diwali, a first. Farmer Prakash Shirshekar sent the initial batch, anticipating record prices during Laxmi Pujan due to early flowering and careful cultivation.
टॅग्स :आंबामुंबईदिवाळी २०२५लक्ष्मीपूजनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनवी मुंबईशेतकरीशेतीफळे