पुणे : पवित्र रमजान महिना आणि उपवास हे समीकरण आहे. या महिन्यात मुस्लिम धर्मियाकडून मोठ्या प्रमाणात उपवास केले जातात.
त्यामुळेच उपवासासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे. दिवाळीपासून सुकामेव्याचे दर स्थिर आहेत.
त्यामुळे आठवडाभरात मागणीत आणखी वाढ होणार आहे. रमजानच्या उपवासामुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात खजूरला मागणी वाढली आहे.
त्यात दिवाळीपासून दर स्थिर असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सुकामेवा व्यापारी विनोद गोयल यांनी सांगितले.विविध प्रकारचा सुकामेवा उपलब्ध झाला आहे.
उष्णता अधिक असल्यामुळे खजूरला मागणी आहे. उपवास सुरू होऊन पंधरा दिवस झाल्यानंतर सुकामेव्याला मागणी वाढते. यंदा बेदाणा आणि खोबरेवगळता बहुतांश प्रकारच्या सुकामेव्याचे दर स्थिर आहेत.
नवीन बेदाणा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात किलोच्या दरात २० ते २५ रुपयांनी घट झाली आहे.
नवीन खोबऱ्याचा हंगाम सुरू झाला नसल्यामुळे आवक कमी आहे. त्यामुळे खोबऱ्याचे दर वाढल्याचेही गोयल यांनी नमूद केले.
रमजानच्या उपवासासाठी खजूर, काजू, बदाम, बेदाणा, चारोळी, पिस्ता, अंजीर, अक्रोड, केशर, खोबरे आदीला मागणी असते.
मार्केडयार्डातील घाऊक बाजारात बदामची इराण, इराक, ऑस्ट्रेलिया येथून, काजूची भारतासह आफ्रिका येथून, खजूर सौदी अरेबिया, अफगाणिस्तान येथून आवक होते.
तसेच खारीक दुबई, पाकिस्तान, पिस्ता इराण, इराक, अमेरिका, खोबरे तामिळनाडू, कर्नाटक, केरळ येथून, तर बेदाणा राज्याच्या विविध भागातून आवक होत आहे. सद्यस्थितीत कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यात नवीन नारळ काढणी सुरू आहे.
नवीन खोबरे येण्यास विलंब होणारनवीन खोबरे बाजारात दाखल होण्यास विलंब होणार आहे. तोपर्यंत घाऊक आणि किरकोळ बाजारात खोबऱ्याचे दर अधिक राहतील, असा अंदाजही नवीन गोयल यांनी व्यक्त केला.
सुकामेव्याचे घाऊक बाजारातील किलोचे दरसुकामेवा प्रकार - प्रतिकिलो दरखजूर - ८० ते २५०खोबरे - २५० ते ३५०बदाम - ८५० ते १,२००काजू - ८५० ते १,२००अंजीर - ८०० ते १,२००चारोळी - १,८०० ते २,२००पिस्ता - १,९०० ते २,६००केशर - २८० रुपये ग्रॅम
रमजानच्या उपवासामुळे बहुतांश प्रकारच्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे. आठवडाभरात मागणीत आणखी वाढ होणार आहे. मुस्लीम धर्मियांत रमजानच्या उपवासाला उत्साह दिसतोय. - नवीन गोयल, व्यापारी, मार्केटयार्ड
अधिक वाचा: राज्यातील 'हा' साखर कारखाना अंतिम ऊस दरात १०० रुपये वाढवून देणार; टनाला किती रुपये मिळणार?
Web Summary : Ramadan boosts dry fruit demand, especially for dates. Prices stable since Diwali. Badam imports from Iran, cashew from Africa and dates from Saudi Arabia. New coconut arrivals delayed, prices high.
Web Summary : रमजान के कारण सूखे मेवों की मांग बढ़ी, खासकर खजूर की। दिवाली से कीमतें स्थिर हैं। ईरान से बादाम, अफ्रीका से काजू और सऊदी अरब से खजूर का आयात होता है। नारियल की आवक में देरी, कीमतें ऊंची।