Join us

सोयाबीनसह उडीद, मुग हमीभावाने खरेदीची तारीख ठरली; प्रत्यक्ष खरेदीला कधीपासून सुरवात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:31 IST

Hamibhav Kharedi हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून तोच माल खरेदी केंद्रावर विकला जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर नजर ठेवण्यासाठी दक्षता पथक स्थापन केले आहे.

मुंबई : यंदाच्या खरिपातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी गुरुवारपासून नोंदणी सुरू होणार असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

तसेच पणन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबविणार असून यंदा त्याचा तुटवडा भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावर्षी सोयाबीन १८ लाख ५० हजार मेट्रिक टन, मूग ३ लाख ३० हजार आणि उडीद खरेदीसाठी ३२ लाख ५६ हजार क्विंटल खरेदीसाठी केंद्र सरकारने उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे.

hamibhav soybean kharedi kendra मागील सोयाबीन खरेदीसाठी ५६५ खरेदी केंद्रे होती, यंदा ही संख्या दुप्पट करण्यात येईल.

खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि कृषी पणन मंडळ यांची नोडल संस्था म्हणून नियुक्ती केल्याचेही ते म्हणाले.

दक्षता पथकाची नजरहमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून तोच माल खरेदी केंद्रावर विकला जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर नजर ठेवण्यासाठी तसेच खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष, दक्षता पथक स्थापन केले आहे.

३ लाख ७५ हजार नोंदणीहमीभावाने कापूस खरेदीसाठी १ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ३.७५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी १२४ खरेदी केंद्रे होती, यावर्षी ती वाढवून १७० केली आहेत.

अधिक वाचा: राज्यात अजून किती दिवस पावसाचा अंदाज; कधीपासून सुरु होणार थंडी? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean, Urad, Moong Procurement at MSP: Dates Announced

Web Summary : Registration for soybean, urad, and moong procurement at MSP starts Thursday; actual purchases begin November 15th. The government has set targets, and the number of procurement centers will be doubled for transparent processes, with vigilance teams in place.
टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतीशेतकरीपीकसोयाबीनमूगजयकुमार रावल