Join us

Cotton Market : रुईच्या झडतीवर ठरतो कापसाला भाव; शेतकऱ्यांना दरवाढीची आस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:40 IST

Cotton Market Update : खासगी खरेदीत किमान ३८ टक्के रुईची झडती आली तरच ७६०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. झडतीशिवाय खासगी खरेदीत कापसाला ७२०० रुपयांपर्यतच दर मिळत असल्याचे वास्तव आहे.

खासगी खरेदीत किमान ३८ टक्के रुईची झडती आली तरच ७६०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. झडतीशिवाय खासगी खरेदीत कापसाला ७२०० रुपयांपर्यतच दर मिळत असल्याचे वास्तव आहे.

सीसीआयने ग्रेड कमी केल्याने कापूस उत्पादकांचा कल खासगी विक्रीकडे आहे. सध्या सीसीआय व खासगी खरेदीत १५० ते २०० रुपयांचा फरक असल्यानेही शेतकरी खासगीमध्ये कापसाची विक्री करीत आहेत.

येथे मात्र प्रत्येक ठिकाणी कापसाची झडती घेतली जात आहे. रुईचे प्रमाण ३८ टक्के असल्यास कापसाला बाजारभावापेक्षा ३०० ते ३५० रुपये दर जास्त मिळतो.

सीसीआयची खरेदी गुलदस्त्यात

• अमरावती जिल्ह्यातील आठ केंद्रांवर सीसीआयद्वारा कापसाची खरेदी केली जात आहे. ग्रेड आता कमी केल्याने हमीभावापेक्षा १०० ते १५० रुपये क्विंटलने कमी दर केंद्रांवर मिळत आहे. जिल्ह्यात सीसीआयने किती खरेदी केली, याची माहिती उपलब्ध नाही.

• सीसीआयचे मुख्यालय अकोला येथे आहे व तेथेदेखील कापूस खरेदीची माहिती दिली जात नाही. सीसीआयची कापूस खरेदी गुलदस्त्यात आहे.

या आठवड्यात कापसाचे दर स्थिर आहे. तुलनेत आवक कमी झाल्याचे दिसून येते. खासगी खरेदीत झडतीनुसार कापसाला भाव दिला जात आहे. - पवन देशमुख, कापूस तज्ज्ञ.

हेही वाचा : न चुकता लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमचेही ठिबक चालेल दोन-चार वर्ष अधिक

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती