Join us

Cotton Market : दर्यापुर बाजारात कापासाला मिळाला उच्चांकी भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:11 IST

दर्यापूर येथील बाजार समितीमध्ये या हंगामातील पहिल्यांदाच कापसाचे खुल्या पद्धतीने सोमवारी (२५ नोव्हेंबर) रोजी लिलावाव्दारे करण्यात आली. काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर (Cotton Market)

Cotton Market : दर्यापूर येथील बाजार समितीमध्ये या हंगामातील पहिल्यांदाच कापसाचे खुल्या पद्धतीने सोमवारी (२५ नोव्हेंबर) रोजी लिलावाव्दारे करण्यात आली. यावेळी कापसाला ८ हजार उच्चांकी भाव मिळाला, तर सरासरी ७ हजार ४५० ते ७ हजार ५२१ रुपयेपर्यंत भाव खुल्या बाजारात मिळाला.

बाजार समिती यार्डवर कापूस शेतमाल वगळता सर्व शेतमालाचा खुल्या पद्धतीने हर्रास होतो. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळून शेतकरी वर्गाचे समाधान बघायला मिळते.

याच पद्धतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस शेतमाल विक्रीदेखील हर्रास पद्धतीने व्हावी  व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव मिळावा, या हेतूने बाजार समिती संचालक मंडळाने निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधत याच पद्धतीचा शुभारंभ खासदार बळवंत वानखडे व सुधाकर भारसाकडे यांच्या मार्गदर्शनात तसेच ॲड. श्रीरंग पाटील अरबट यांच्या हस्ते झाला. बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी शेतकरी वर्गाला केलेल्या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.

कापूस खरेदीचा शुभारंभ श्रीरंग अरबट, बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, उपसभापती राजू कराळे, संचालक बाळासाहेब हिंगणीकर, बाळासाहेब वानखडे, कांचनमाला गावंडे, साहेबराव भदे, गजानन देवतळे, राजेंद्र वढाळ, भारत आठवले, अनिल भारसाकडे, संचालक सुनील डिके, डॉ. अभय गावंडे, राजेश शेठ राठी, प्रभाकर तराळ, असिफ खान, बाजार समितीचे सचिव हिंमतराव मातकर, खरेदी विक्रीचे संचालक बाळासाहेब टोळे, दिनकरराव गायगोले, सी. सी. आय. केंद्र प्रभारी दत्तात्रय कदम, व्यापारी मनोज खंडेलवाल, पुरुषोत्तम साबळे, व्यापारी अंशुल अग्रवाल उपस्थित होते.

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डनागपूर