Join us

Chiku Fruit Market: औषधी गुणधर्मांनी युक्त चिकूची वाढली मागणी; भाव मात्र स्थिर! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:20 IST

Chiku Fruit Market: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि ऊर्जा देणारे चिकू हे फळ आरोग्यदायी आणि चविष्ट असले तरी, यंदा आंबा, टरबूज आणि सफरचंदासारख्या फळांसह चिकूला बाजारात मागणी आहे. नागपुरात सध्या कर्नाटक, पुणे आणि नाशिकहून चिकूची आवक सुरू असून, सेंद्रिय चिकूचे दर १०० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. (Chiku Fruit)

Chiku Fruit Market : उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि ऊर्जा देणारे चिकू हे फळ आरोग्यदायी आणि चविष्ट असले तरी, यंदा आंबा, टरबूज आणि सफरचंदासारख्या फळांसह चिकूला बाजारात मागणी आहे. (Chiku Fruit)

नागपुरात सध्या कर्नाटक, पुणे आणि नाशिकहून चिकूची आवक सुरू असून, सेंद्रिय चिकूचे दर १०० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. उन्हाळ्यात थंडाव्यासाठी चिकू (सपोटा) चांगला असतो. ते एक थंड आणि गोड फळ आहे, ज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. (Chiku Fruit)

उन्हाळ्यात त्याच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होतो. यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. यंदा बाजारात भाव स्थिर आहेत. (Chiku Fruit)

तापमानाचा उच्चांक

तापमानाचा रोज उच्चांक वाढत आहे. त्यातच शरीराला थंडावा देणाऱ्या फळांचे भाव वाढले आहेत. लोकांची आंबे, टरबूज, सफरचंद, अननस, मोसंबी या फळांची खरेदी वाढली आहे. सोबत भावही वाढले आहेत.

टरबूज दर्जानुसार ५० ते १०० ६ रुपये नग, आंबे १२५ ते १५० रुपये किलो तसेच अन्य फळांचे दरही वाढले आहेत.

नागपुरात अन्य जिल्हे व राज्यातून चिकूची आवक

प्रतिकूल हवामानामुळे नागपूर जिल्ह्यात चिकूचे उत्पादन होत नाही. ते प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात, आंध प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यांमध्ये होते.

कळमना बाजारात पुणे, नाशिक वा कर्नाटक राज्यातून चिकूची आवक ५ आणि १० किलोच्या बॉक्समध्ये होते.

चिकू दाहनाशक; अशक्तपणा दूर करतो

चिकू गोड, थंड आणि भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे. चिकू दाहनाशक असून अशक्तपणा दूर करतो. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकारचा उत्साह, चैतन्य निर्माण होते.

यातील पॉलिफेनॉलिक या घटकामुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब अशा आजारात चिकूचे सेवन केल्यास आराम मिळू शकतो.

चिकूमध्ये लोह, कॅल्शियम व साखर

चिकूमध्ये लोह, कॅल्शियम आणि साखर या तिन्ही घटकांचे प्रमाण कमी-जास्त प्रमाणात असते. यातील लोह रक्तपेशी तयार करतात.

कॅल्शियम हाडांना आणि दातांना मजबूत करते. नैसर्गिकरीत्या असलेली ऊर्जा प्रदान करते.

चिकूमध्ये टॅनिन आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सर्दी, घसादुखी आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.

सेंद्रिय चिकूचे भाव १०० ते २०० रुपयांवर

कळमन्यात चिकू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चिकू सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात. मागणी वाढताच भावही वाढले. दर्जानुसार ५० ते ८० रुपये किलो आहेत. सेंद्रिय चिकूचे भाव १०० ते २०० रुपयांवर आहेत. आरोग्याबाबत जागरूक नागरिक मॉलमध्ये खरेदी करीत आहेत.

कोकण भागात चिकू लागवड सर्वाधिक

चिकूची लागवड महाराष्ट्रात आणि इतर अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात, डहाणू-घोलवड (पालघर जिल्हा) आणि इतर कोकण भागांमध्ये लागवड केली जाते. याव्यतिरिक्त, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही लागवड करण्यात येते.

उन्हाळ्यात चिकूची मागणी कमी आहे. तुलनेत आंबे जास्त विकले जातात. त्यामुळे चिकू विक्रीसाठी जास्त आणत नाहीत. या दिवसांत आंबे, केळी, सफरचंद, टरबूज या फळांना मागणी असते. - समय तिवारी, फळ विक्रेता.

हे ही वाचा सविस्तर : Compost Khat: 'कंपोस्ट क्रांती': गावागावांतून उगम होतोय हरित समृद्धीचा! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रफळेबाजारमार्केट यार्डनागपूर