गजानन मोहोड
सोयापेंड (डीओसी) ची मागणी घटल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर गडगडले आहेत. हमीभाव ४ हजार ८९२ रुपये असताना सोयाबीनला सध्या ३ हजार ८०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा फटका बसला. (Bhavantar Yojana)
अशा परिस्थितीत भावांतर योजनेचा लाभ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी आली आहे. अशा स्थितीत मागणी वाढून दर वाढणार, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. (Bhavantar Yojana)
प्रत्यक्षात हंगामापूर्वीच सोयाबीनचे दरात कमी आलेली आहे. यावर्षी केंद्र शासनाने ४ हजार ८९२ रुपये क्विंटल असा सोयाबीनचा हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र, सोयाबीनचे दर चार हजारांचे आत आहे. (Bhavantar Yojana)
७ मार्चला सोयाबीनला ३ हजार ७०० ते ३ हजार ७०० रुपये क्विंटल भाव मिळाला. ७ मार्चला यामध्ये १०० रुपयांनी वाढ झालेली आहे.
प्रत्यक्षात यंदा सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत. शासनाचा कोणताही प्रक्रिया उद्योग सोयाबीनसाठी नाही. डीओसीच्या दरात कमी आल्याने प्लॉटधारकांकडून सोयाबीनची खरेदी होत नाही. (Bhavantar Yojana)
परदेशात उत्पादन चांगले झाल्याने देशांतर्गत सोयाबीनला सध्या उठाव नाही, सोयापेंडचे दर पडले आहेत. त्यामुळे सध्या सोयाबीनमध्ये फारशा दरवाढीची शक्यता नाही. - अमर बांबल, अडते, बाजार समिती, अमरावती
काय आहे भावांतर योजना?
* सन २०२३-२४ मधील हंगामात आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे कापूस व सोयाबीनचे दरात कमी आली. त्यामुळे शासनाने दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजारांची मदत कापूस व सोयाबीन पिकांसाठी केली.
* यंदाच्या हंगामात या दोन्ही पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.
* ४,८९२ रुपये क्विंटल असा सोयाबीनचा हमीभाव जाहीर केला आहे. सोयाबीनचे दर चार हजारांचे आत आहे.
सोयाबीनचे बाजारभाव (रु/क्विं)
२४ फेब्रुवारी | ३,७५० ते ३,९५१ |
२८ फेब्रुवारी | ३,८०० ते ३,९६१ |
३ मार्च | ३,७५० ते ३,९०० |
५ मार्च | ३,७५० ते ३,९०० |
७ मार्च | ३,६५० ते ३,८७५ |
१० मार्च | ३,७५० ते ३,९२५ |