Join us

Bedana Bajar Bhav : सांगली मार्केटमध्ये बेदाण्याच्या दरात वाढ; कोणत्या बेदाण्याला किती दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:34 IST

येथील मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी (ता. जत) येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रतिकिलो ४७० रूपये भाव मिळाला.

सांगली : येथील मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी (ता. जत) येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रतिकिलो ४७० रूपये भाव मिळाला.

रमेश श्रीशैल तळी असे त्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. हा दर या हंगामातील विक्रमी आहे. मागील वर्षापेक्षा बेदाणा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याचे बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितले.

तसेच रमजान सणामुळे बेदाण्यास मागणी जास्त असल्यामुळे दर तेजीत आहेत. द्राक्षाच्या मागील मार्च २०२४ च्या हंगामात दर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाण्याचे उत्पादन घेतले.

परिणामी गरजेपेक्षा जास्त बेदाणा उत्पादन झाल्यामुळे दर खूपच उतरले होते. यावर्षी द्राक्षाचे उत्पन्न घटले असून दरही चांगला आहे. द्राक्षाचे दर जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट द्राक्षांची विक्री केली आहे.

बेदाण्याचे उत्पादन घटले आहे म्हणून सध्या बेदाण्यास चांगला दर मिळत आहे. त्यातच रमजान महिना असल्यामुळेही देशभरातून व्यापारी बेदाणा खरेदीसाठी सांगलीत आले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर चांगल्या दर्जाच्या बेदाण्यास प्रतिकिलो २०० ते ४७० रुपये दर मिळत आहे. बेदाण्यास सरासरी प्रतिकिलो १५० ते ३०० रुपये दर मिळत आहे, बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितले.

बेदाण्याचे असे आहेत दर (प्रतिकिलो)हिरवा बेदाणा : १३० ते २००पिवळा बेदाणा (गोल) : १८० ते २००काळा बेदाणा : ७० ते ११०हिरवा लांब बेदाणा (सुंटेखणी): २३० ते ३५०काळा बेदाणा शरद : १३० ते २३०

बेदाण्याचे उत्पादन कमी असल्यामुळे दरातील तेजी कायम राहणार आहे. रमजान महिन्यामुळे बेदाण्यास सर्वाधिक मागणी असल्यामुळे दरातील तेजी आणखी वाढली आहे. बेदाण्यास प्रतिकिलो २०० ते २५० रुपये दर स्थिर असणार आहे.  - राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, बेदाणा असोसिएशन, सांगली

अधिक वाचा: Vihir Anudan Yojana : उन्हाळा आलाय.. जुन्या व नव्या विहिरीचे काम करताय मग घ्या अनुदान; वाचा सविस्तर

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डसांगलीकर्नाटक