Join us

Basmati Rice बासमती तांदळाने केला विक्रम, निर्यातीतून कमवले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 3:36 PM

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ५० लाख टन बासमती तांदळाच्या निर्यातीतून तब्बल  ४८ हजार कोटी रुपयाची कमाई झाली आहे. भारत बासमती तांदळाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ५० लाख टन बासमती तांदळाच्या निर्यातीतून तब्बल  ४८ हजार कोटी रुपयाची कमाई झाली आहे. भारत बासमती तांदळाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आजवरची विक्रमी निर्यात झाली

२०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत बासमती तांदळाच्या निर्यातीत ११.५ टक्क्यांनी वाढ होऊन ४४ हजार कोटी रुपये किंमतीच्या ४९ लाख टन तांदळाची निर्यात झाली होती.

भारतातून सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इराण, अमेरिका, युरोपीय देश, ब्रिटन, इराक आणि आशियाई देश अशा जगातील शंभरहून जास्त देशांत बासमती तांदळाची निर्यात होते. यात सर्वात जास्त तांदूळ सौदी अरेबिया या देशाने आयात केला आहे.

निर्यातीसाठी बासमतीचे दर प्रतिटन ८ ते १२ हजार रुपयांपर्यंत आहेत. देशातून बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे जगभरात बिगरबासमती तांदूळ खाणाऱ्यांनी बासमती तांदळाला प्राधान्य दिले आहे. 

पाकिस्तानमधून होणारी निर्यात घटली. परिणामी भारतीय बासमतीची निर्यात वाढली. मागील वर्षाच्या मानाने यावर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाची आणि चांगल्या दराने निर्यात केली आहे. भारताने उरुग्वे या देशाला सर्वात जास्त दराने तांदळाची निर्यात कली आहे.

बासमती विशेष- लांब, पातळ दाणे असलेला सुगंधी तांदूळ आहेतांदळाचे वैशिष्ट्य त्याची चव आणि सुगंध आहे.हा तांदूळ अतिशय पौष्टिक आणि खमंग आहे.प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळमध्ये पारंपारिकपणे पिकवला जातो.बासमती तांदळाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचा वाटा ६५% आहे.बासमती भौगोलिकदृष्ट्या भारत आणि पाकिस्तानमधील काही जिल्ह्यांसाठी विशेष आहे.

अधिक वाचा: Mango Export परदेशात पोहोचला इतका मेट्रिक टन आंबा

टॅग्स :भातशेतीसौदी अरेबियाUruguayपाकिस्तानशेतकरीपीक