lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > बासमती तांदळाला राज्यात सध्या मिळतोय सर्वाधिक दर, क्विंटलमागे..

बासमती तांदळाला राज्यात सध्या मिळतोय सर्वाधिक दर, क्विंटलमागे..

Basmati rice is currently fetching the highest price per quintal in the state. | बासमती तांदळाला राज्यात सध्या मिळतोय सर्वाधिक दर, क्विंटलमागे..

बासमती तांदळाला राज्यात सध्या मिळतोय सर्वाधिक दर, क्विंटलमागे..

आज राज्यात मसूरा, कोलम, परमल, चिनोर, लुचाई, नं २ अशा वेगवेगळ्या जातीचा तांदूळ विक्रीसाठी बाजारसमितींमध्ये येत आहे.

आज राज्यात मसूरा, कोलम, परमल, चिनोर, लुचाई, नं २ अशा वेगवेगळ्या जातीचा तांदूळ विक्रीसाठी बाजारसमितींमध्ये येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात बासमती तांदळाला चांगला भाव मिळत असून इतर तांदळाच्या तूलनेत बासमती वरचढ असल्याचे पहायला मिळत आहे. क्विंटलमागे साधारण ८००० ते ९००० रुपयांचा भाव बासमतीला मिळत असल्याचे पणन विभागाने नोंदवले.

दरम्यान आज राज्यात मसूरा, कोलम, परमल, चिनोर, लुचाई, नं २ अशा वेगवेगळ्या जातीचा तांदूळ विक्रीसाठी बाजारसमितींमध्ये येत आहे.  पुणे बाजारसमितीत बासमती तांदळाला आज सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे सर्वसाधारण ९५५० ते १३,००० रुपयांचा भाव मिळत आहे. इतर जातींच्या तूलनेत बासमतीला मिळणारा दर दुपटीहून अधिक आहे.

पुण्यात आज बासमतीसह मसुरा व कोलम जातीचा तांदूळही विक्रीसाठी आला होता. यावेळी मसुरा जातीच्या तांदळाला क्विंटलमागे ३३५० रु तर कोलमला ५६०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. मुंबईतही बासमती तांदूळ चमकला असून सर्वसाधारण ८७०० रु क्विंटल असा सर्वसाधारण भाव सुरु आहे. ठाण्यात बासमती तांदळाला  ७७००  रुपयांचा दर मिळाला..

कोणत्या तांदळाला आज कसा भाव मिळाला?

शेतमाल: तांदूळ

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/04/2024
मंबईलोकल17227290075005200
मंबईबसमती3320750095008700
नागपूरलुचाई50300032003150
नागपूरचिनोर100560060005900
नागपूरपरमल41380042004100
पालघर---365315048503860
पुणेबसमती386100130009550
पुणेमसुरा407330034003350
पुणेकोलम658380074005600
रायगडनं. २156295052004250
रायगडकोलम20100015001200
सोलापूरमसुरा970320064554005
ठाणेलोकल720300050004000
ठाणेबसमती3660088007700
ठाणेमसुरा3400055004750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)24078

 

Web Title: Basmati rice is currently fetching the highest price per quintal in the state.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.