Join us

Amba Niryat : यंदा चार हजार टन आंबा निर्यात होणार; निर्यातीसाठी या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:36 IST

Mango Export 2025 आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये व्हीएचटी, आयफएसी व व्हीपीएफ प्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे.

नवी मुंबई : आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये व्हीएचटी, आयफएसी व व्हीपीएफ प्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे.

येथून अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला निर्यात सुरू झाली असून, लवकरच युरोपियन देशांमध्येही निर्यात सुरू होणार आहे.

अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आंबा निर्यात करताना त्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. ही सुविधा नसल्यामुळे काही वर्षापूर्वी आंब्यासह भारतीय भाजीपाल्यावर काही देशांमध्ये निर्बंध लादले होते.

ही गैरसोय दूर करण्यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामधून यावर्षी चार हजार टन आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

१५०० टन आंबा अमेरिकेला निर्यातीचे उद्दिष्ट- अमेरिका व ऑस्ट्रेलियाला हवाई मार्गे निर्यात सुरू झाली आहे. पहिल्या आठवड्यात २०० टन निर्यात अमेरिकेत झाली आहे.- यावर्षी ऑस्ट्रेलियाला ७५, न्यूझीलंड २००, जपान ७०, दक्षिण कोरिया १०, युरोपियन देशांमध्ये १७१० टन आंबा निर्यात होण्याची शक्यता आहे.

आयएफसी सुविधा- पणन मंडळाने सुरू केलेल्या विकिरण सुविधा केंद्रातून (आयएफसी) मधून अमेरिका व इतर काही देशांमध्ये आंबा निर्यात केला जातो.- अमेरिकेचे निरीक्षक स्वतः येथे येऊन आंब्याचे परीक्षक असतात. आंब्यावर तीन मिनिटांची गरम पाण्याची व रेडिएशन ट्रिटमेंट केली जाते.

इतर राज्यांनाही सुविधाराज्यातील निर्यातदारांसह यावर्षी मध्यप्रदेश, गुजरात व दक्षीणेकडील राज्यांमधील निर्यातदारही या सुविधा केंद्रांचा लाभ घेणार आहेत.

व्हीएचटी प्रक्रियाव्हीएचटी अर्थात बाष्प उष्णता उपचार प्रक्रियेद्वारे युरोपियन देशांमध्ये आंबा निर्यात केला जातो. यामध्ये एक तासाची हॉट वॉटर प्रक्रिया केली जाते.

व्हीपीएफयुरोपियन देशांमध्ये आंबा व भाजीपाला निर्यात करण्यासाठी व्हीपीएफ प्रक्रिया करण्यात येते. पणन मंडळाच्या केंद्रामध्ये ही सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

अधिक वाचा: Mango Market Mumbai : मुंबई बाजार समितीवर आंब्याचे राज्य; कोणत्या आंब्याला किती दर? वाचा सविस्तर

टॅग्स :आंबाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमुंबईनवी मुंबईअमेरिकाआॅस्ट्रेलियाजपान