गणपतीसाठी दुर्वाबरोबरच आवर्जून वाहिला जाणारा मनमोहक सुगंध देणारा केवडा आता कोकण भागात दुर्मीळ होत चालला आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या केवड्याच्या एका पातीला १००, तर केवड्याला किलोला १००० रुपये असा भाव असल्याने केवड्याच्या सुगंध चांगलाच महागला आहे.
गणपतीला दुर्वाबरोबरच केवडाही प्रिय आहे. मात्र, आता समुद्रकिनारेच पार उद्ध्वस्त झाल्याने किनाऱ्यावर असलेली केवड्याची बनेही मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहेत. त्यामुळे गणपतीसाठी आवर्जून वाहिला जाणारा मनमोहक सुगंध देणारा केवडा परिसरात दुर्मीळ झाला आहे.
उरण परिसरातील घारापुरी, नशेणी, दादर पाडा, केगाव-दांडा-पीरवाडी ते करंजा परिसरातील विविध सागरी किनाऱ्यांवर ठराविक ठिकाणी केवड्याची बने आहेत. केवडा श्रावण-भाद्रपद महिन्यातच फुलतो, बहरतो.
फुललेला केवडा मनालाच नव्हे, तर जवळपास परिसरातील वातावरणही सुगंधी सुवासाने प्रसन्न करून टाकतो. विशेषतः गणपती सणात केवड्याच्या फुलण्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते.
केवड्याची वने नामशेषमागणी असूनही बाजारात केवडेच येईनासा झाले आहेत. कारण परिसरातील केवड्याची बनेच नामशेष होण्याच्या मार्गाला आहेत. त्यामुळे गणपतीलाही केवडा दुर्मीळ झाल्याची माहिती विक्रेत्या ध्रुपदा कातकरी या आदिवासी महिलेने दिली.
औषधे बनविण्यासाठीही वापर◼️ केवड्याला केतकी, ताझम फू, धुली पुष्पम्, पंडानस ट्री, अब्रेला ट्री, फ्रॅग्रांट स्कू पाईन अशी इतर अनेक नावे आहेत.◼️ केवड्याच्या फुलांचा सुवासिक अत्तर आणि तेल बनविण्यासाठीही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.◼️ झाडाची मुळे, पाने, खोड आणि इतर भागांपासून मॅट बनविण्यापासून औषधे बनविण्यापर्यंत वापर केला जातो.◼️ देशातील काही भागांत केवड्याच्या झाडांची लागवडही केली.
किलोला ७०० रुपयांचा भाव◼️ समुद्र किनारपट्टीची दिवसेंदिवस प्रचंड धूप होत चालली आहे. त्यामुळे केवड्याची बने आता नामशेष होणाच्या मार्गाला लागली आहेत. गणपती सण आला की, केवड्याचे फूल गणेशाला वाहण्यासाठी गणेशभक्त उत्सुक असतात.◼️ बाजारपेठेत विक्रीसाठी येणारी केवडा फुले हातोहात विकली जात होती. पूर्वी उरणच्या बाजारात ५०-१०० रुपयांना विपुल प्रमाणात मिळणारा केवडा आता ७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.◼️ केवड्याची एक पाती (पान) ५० रुपयांपर्यंत विकली जात असल्याची माहिती गणेश सुतार या ग्राहकाने दिली. तर केवड्याच्या पातीच्या नावाने केतकीचे पान २० रुपयांना विक्रीसाठी बाजारात आहे.
अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न