औदुंबर पाडुळे
आखातातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतातील स्थानिक अगरबत्ती उद्योगावर जाणवू लागला आहे. अगरबत्ती निर्मितीसाठी कच्च्या मालामध्ये वापरल्या जाणाऱ्या डीईपी (डायइथाइल फॉलेट) ऑइलच्या दरात मोठी वाढ झाल्याने उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
अगरबत्तीत सुगंध टिकवून ठेवण्यासाठी, तसेच मिश्रणाला योग्य बांधणी मिळण्यासाठी डीईपी ऑइलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दोन महिन्यांपूर्वी १३५ रुपये किलो दराने उपलब्ध होणारे हे ऑइल सध्या २४० रुपये किलो दराने मिळत आहे. जवळपास दुप्पट दरवाढ झाली आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने पुरवठा घटला असून, त्याचा परिणाम दरवाढीवर झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. डीईपी ऑइल हा उत्पादन प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्या दरवाढीमुळे एकूण उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
कच्च्या मालासाठी अधिक रक्कम
• कच्च्या मालासाठी अधिक रक्कम मोजावी लागत असल्याने लघुउद्योगांवर आर्थिक ताण वाढला आहे. परिणामी होलसेल बाजारात अगरबत्तीच्या दरात वाढ झाली असून, किरकोळ बाजारातही लवकरच दरवाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
• उत्पादन मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढण्याची शक्यता असताना खर्चामुळे उद्योगासमोर आव्हान उभे ठाकले आहे.
युद्धजन्य परिस्थितीचा अगरबत्ती उद्योगावर थेट परिणाम होत आहे. डीईपी ऑइलच्या दरात दुप्पट वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. होलसेल बाजारात अगरबत्तीच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही लवकरच दरवाढ होण्याची शक्यता आहे. शासनाने दरनियंत्रण व कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - बंटी महाजन, संचालक, अगरबत्ती उद्योग.
Web Summary : Gulf tensions impact agarbatti industry. DEP oil prices doubled, raising production costs. Small businesses face financial strain. Agarbatti prices are expected to increase soon, requiring government intervention for price control and stable raw material supply.
Web Summary : खाड़ी तनाव से अगरबत्ती उद्योग प्रभावित। डीईपी तेल की कीमतें दोगुनी होने से उत्पादन लागत बढ़ी। छोटे व्यवसाय वित्तीय तनाव का सामना कर रहे हैं। अगरबत्ती की कीमतें जल्द बढ़ने की उम्मीद, सरकार से मूल्य नियंत्रण और स्थिर कच्चे माल की आपूर्ति की मांग।