Join us
Daily Top 2Weekly Top 5

गहू व हरभरा 'ह्या' दराच्या खाली खरेदी केला तर व्यापाऱ्यांवर होणार कारवाई; वाचा आजचे गहू व हरभऱ्याचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:56 IST

काही व्यापारी आवक जास्त आहे, मालाची प्रत खराब आहे, अशी कारणे सांगून गहू अवघ्या १८०० ते २२०० रुपये भावाने खरेदी करत आहेत.

हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी दिला आहे.

चालू वर्षीपासून केंद्र सरकारने गव्हाचा हमीभाव २ हजार ५८५ रुपये प्रतिक्विंटल आणि हरभऱ्याचा भाव ५ हजार ८७५ रुपये प्रतिक्विंटल असा दर जाहीर केला आहे.

असे असताना काही व्यापारी आवक जास्त आहे, मालाची प्रत खराब आहे, अशी कारणे सांगून गहू अवघ्या १८०० ते २२०० रुपये भावाने खरेदी करत आहेत.

अनेक संकटांना तोंड देऊन शेतकरी आपला शेतमाल पिकवीत आहेत. काही व्यापाऱ्यांकडून हरभऱ्याचे भाव देखील पाडले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांनी आमच्याकडे केलेल्या आहेत.

वास्तविक हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मुळातच हमीभाव काढताना केंद्र शासनाने चुकीच्या पद्धतीने उत्पादन खर्च धरलेला आहे.

विद्यापीठाने आणि राज्य सरकारने केंद्राला कळविलेला उत्पादन खर्च आणि केंद्र सरकारकडून दिला जाणारा हमीभाव यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे.

उत्पादन खर्चच कमी दाखविला गेल्याने साहजिकच हमीभाव देखील पाडला जात असून, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेतीमाल हा सरकारी हमीभावाने खरेदी करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हातभार लागू शकेल.

जर हमीभावापेक्षा कमी भावाने शेतीमाल खरेदी होत असल्यास किंवा करीत असल्यास नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊन शेतकऱ्यांना योग्य भाव देऊन व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे.

हमीभावापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांनी शेतमाल विकू नये, असे आवाहन सभापती नंदकुमार पाटील यांनी केले आहे.

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आजचे गहू व हरभरा दर

शेतमाल : हरभरा

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/04/2026
पुणे---क्विंटल44590069006400
पैठण---क्विंटल15500050005000
राजूरा---क्विंटल193514551805165
अकोलाकाबुलीक्विंटल29530553055305
तुळजापूरकाट्याक्विंटल115520152015201
मुरुमलालक्विंटल113490054505130
जळकोटलालक्विंटल131535556815571
अकोलालोकलक्विंटल1326500055355385
नागपूरलोकलक्विंटल2137480054005250
अजनगाव सुर्जीलोकलक्विंटल100460052505000

शेतमाल : गहू

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/04/2026
तुळजापूर---क्विंटल135210022002150
नेवासा२१८९क्विंटल50260026002600
पैठणबन्सीक्विंटल345210025002300
मुरुमबन्सीक्विंटल74207532303230
अकोलालोकलक्विंटल880215027002655
उल्हासनगरलोकलक्विंटल600320034003300
पुणेशरबतीक्विंटल547400047004350

अधिक वाचा: २०१७ च्या कर्जमाफीतील उर्वरित शेतकऱ्यांना ५०० कोटींचा निधी आला; कधी सुरु होणार वाटप?

English
हिंदी सारांश
Web Title : Action against traders buying wheat, gram below MSP: Rates announced.

Web Summary : Traders buying wheat and gram below MSP will face legal action. The government-fixed rate for wheat is ₹2,585/quintal and for gram ₹5,875/quintal. Farmers are urged not to sell below MSP, to avoid exploitation. Current market rates are listed.
टॅग्स :गहूबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डशेतकरीकेंद्र सरकारसरकारहरभरा