Lokmat Agro >शेतशिवार > सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

Women will get interest-free loan of Rs 5 lakh from the government; What is the scheme? Know in detail | सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

सरकारतर्फे महिलांना मिळणार पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

lakhpati didi yojana maharashtra सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फेमहिलांना प्रतिमहिना १५०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबविण्यात आली होती.

सध्या एकूण सात राज्यांत महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनादेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

योजनेचा उद्देश काय?
केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबविली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.

लखपती दीदी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज
- फोटो
- पत्त्याचा पुरावा
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते विवरण
- मोबाइल नंबर

योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?
- या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा.

पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत
-
ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे.
- महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जातात. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे.
- या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते.
- त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.

योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा?
-
लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल.
- या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल.
- या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल.
- यासाठी महिला व बालविकास विभागाकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागेल.

अधिक वाचा: मांस व अंडी असा दुहेरी नफा देणारी ही कोंबड्याची जात ठरतेय फायदेशीर; वाचा सविस्तर

Web Title: Women will get interest-free loan of Rs 5 lakh from the government; What is the scheme? Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.