Join us

Women in Gram Panchayat : राज्यातील ग्रामपंचायतींवर महिलांचाच झेंडा; आरक्षण निश्चित वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:17 IST

Women in Gram Panchayat : लोकसंख्येच्या प्रमाणात व समर्पित आयोगाच्या निकषानुसार राज्यातील ग्रामपंचायतींच्या २४,८८२ थेट सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे. आता ग्राम पंचायतींमध्ये महिलाराज असेल. (Women in Gram Panchayat)

Women in Gram Panchayat : लोकसंख्येच्या प्रमाणात व समर्पित आयोगाच्या निकषानुसार राज्यातील ग्रामपंचायतींच्या २४,८८२ थेट सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे. (Women in Gram Panchayat)

यामध्ये १२,४७३ पदे महिला सरपंचांसाठी राखीव असल्याने या ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज राहील. सन २०३० पर्यंत हे आरक्षण कायम राहणार आहे.या अनुषंगाने ग्रामविकास विभागाची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे.(Women in Gram Panchayat)

यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग यामध्ये ५० टक्के थेट सरपंच पदे महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणाऱ्या ग्रामपंचायती वगळण्यात आलेल्या आहेत. (Women in Gram Panchayat)

समर्पित आयोगाच्या निकषानुसार

५० टक्क्यांवर आरक्षण जात असल्यास ती पदे सर्वसाधारण प्रवर्गात अधिसूचित होतात. शिवाय नागरिकांचा मागास प्रवर्गची पदे २७ टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

अधिसूचनेनुसार आरक्षित सरपंचपदाची संख्या निश्चित झालेली असली तरी तालुक्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात व निकषानुसार कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या प्रवर्गातील आरक्षण निश्चित होणार आहे, यासाठी मात्र इच्छुकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

थेट सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण (मार्च २०३० पर्यंत)

अनुसूचित जाती३२५८ पदे (यापैकी १६३६ पदे महिलांकरिता)
अनुसूचित जमाती१८४३ पदे (यापैकी ९३३ पदे महिलांसाठी)
नागरिकांचा मागास प्रवर्ग६१२५ पदे (३१०५ पदे महिलांसाठी)
सर्वसाधारण प्रवर्ग१३५८६ पदे (यापैकी ६७९९ पदे महिलांकरिता)
एकूण२४८८२ थेट सरपंचपदे (यापैकी १२४७३ पदे महिलांकरिता

हे ही वाचा सविस्तर : Mavim : उद्योगांच्या माध्यमातून 'माविम'च्या बचत गटांकडून वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल!

टॅग्स :शेती क्षेत्रग्राम पंचायतमहिलामहिला आणि बालविकासमहिला आरक्षणमहाराष्ट्र