Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आत्मा'च्या मदतीने यंदा रायगडच्या शेतशिवारात डोलणार लाल, काळे, जांभळ्या रंगाचे भातपीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 13:54 IST

रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे. यापैकी २३ हेक्टर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण योजनेतून रंगीबेरंगी लाल, काळ्या भाताची लागवड करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे. यापैकी २३ हेक्टर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण योजनेतून रंगीबेरंगी लाल, काळ्या भाताची लागवड करण्यात येत आहे.

त्यासाठी 'आत्मा' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या ताणाचे बियाणे देण्यात येत आहे. पारंपरिक भाताबरोबरच पौष्टिक गुणधर्मामुळे सध्या अशा रंगीबेरंगी भातलागवडीवर भर देण्यात येत आहे.

म्हसळा तालुक्यात तीन हेक्टर जागेत नावीन्यपूर्व योजनेतून तर, रोहा तालुक्यात २० हेक्टर क्षेत्रात लाल, काळ्या भाताची पेरणी झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

पावसाचे आगमन लवकर झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी भातपेरणीची कामे रखडली आहेत. शेतात पाणी साचल्याने शूळ वाफ्यावरील पेरणी करता आलेली नाही. अशाही परिस्थितीत जिल्ह्यात ६० टक्के पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात यदा ८३ हजार हेक्टर भातलागवडीचे नियोजन होते, परंतु इतक्या क्षेत्रासाठी पुरेशी पेरणी न न झाल्याने यंदा भाताची रोपे कमी पहण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे; मात्र अशा बिकट परिस्थितीत नावीन्यपूर्व योजनेतून रंगीत भाताची पेरणी करण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे.

भाताची उत्पादकता वाढावी, यासाठी कृषी विभागाकढून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आधुनिक भात लागवड पद्धती आणि संकरित बियाण्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे; मात्र अजूनही पारंपरिक बियाण्यांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना संकरित बियाणे लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

यंदा काही शेतकऱ्यांना बियाणे मोफत दिले आहे. त्यांनी पुढील वर्षीच्या लागवडीसाठी अन्य शेतकऱ्यांना हे बियाणे उपलब्ध करून द्यायचे आहे. यामुळे दरवर्षी लाल, काळ्या आणि जांभळ्या भातपिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. उत्पादित भाताला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - यंदना शिंदे, कृषी अधीक्षक, रायगड

गुणकारी रंगीत तांदूळ

• लाल, काळ्या आणि जांभळ्या कर्बोदकांचे प्रमाण सामान्य भाताच्या तुलनेत अधिक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. रंगाच्या भातात प्रथिने आणि

• हा भात मधुमेह आणि इतर आजारांतील रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे अलीकडच्या काळात या भाताची मागणी वाढली आहे.

• त्यामुळे रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठचा प्रमाणात लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भालाची लागवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :भातरायगडशेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकबाजार