Join us

Wildlife Water shortage : कृत्रिम पाणवठे वन्यजीवांसाठी ठरताहेत वरदान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:12 IST

Wildlife Water shortage : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, त्यांची पाण्याची भटकंती (Water shortage) थांबावी म्हणून वनपरिक्षेत्रांतर्गत कृत्रिम पाणवठे (Artificial Water) स्वच्छ करून पिण्याचे पाणी भरले जात आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागली असून, उन्हाचा कडाका वाढला असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात असतात. पाण्यासाठी त्यांची भटकंती (Water shortage) करावी लागू नये, म्हणून बीड वनपरिक्षेत्रांतर्गत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

कृत्रिम पाणवठे (Artificial Water) स्वच्छ करून वन्य प्राण्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याने भरून ठेवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. होळीचा सण झाल्यानंतर अधिकृतरीत्या उन्हाळा सुरू होतो. 

परंतु यंदा उन्हाळ्यापूर्वीच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे जंगलामध्ये असलेल्या वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती (Water shortage) करावी लागते.

पाणी न मिळाल्यास वन्य प्राणी लोकवस्तीकडे भरकटण्याचा धोका अधिक असतो. वन्यजीवांची भटकंती कमी व्हावी, यासाठी बीड वनपरिक्षेत्रांतर्गत कृत्रिम पाणवठे (Artificial Water) स्वच्छ करून त्यात पाणी भरले जात आहे.

वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी  वनविभागाने  ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले  होते. मात्र वाढत्या उन्हामुळे हे पाणवठे कारेडे पडले आहेत. 

हे पाणवठे भरण्यासाठी वनविभागाने टँकरव्दारे पाणी भरताना दिसत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यास पाणी मिळेल. प्राण्यांचा पाण्याच्या कमी होण्यास मदत मिळणार आहे.  

वनपरिक्षेत्र बीड अंतर्गत विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या आदेशान्वये बीड वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गाडेकर, नेकनूरचे वनपाल बहिरवाळ, वनरक्षक मेटे, जगताप, डोळस, चव्हाण, राऊत, शिंदे यांनी कृत्रिम पाणवठे स्वच्छ करून वन्य प्राण्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याने भरून ठेवण्याचे काम सुरू केले आहे. याचा लाभ वन्य प्राण्यांना होणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Livestock Census : राज्यात पशुगणना मोहिमेत 'हा' जिल्हा द्वितीय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रवन्यजीवपाणीकपातप्राणीवनविभाग