Join us

White Onion Production : पांढऱ्या कांद्याचे बियाणे उत्पादीत करा सोबत साडेचार हजार अनुदान मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:30 IST

पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार तीन हेक्टर क्षेत्रावर बियाणे उत्पादन तयार करण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन कृषी विभागाने तयार केला आहे. एक गुंठे शेत क्षेत्रावर बियाणे उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना साडेचार हजार अनुदानही जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

अलिबाग : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार तीन हेक्टर क्षेत्रावर बियाणे उत्पादन तयार करण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन कृषी विभागाने तयार केला आहे. एक गुंठे शेत क्षेत्रावर बियाणे उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना साडेचार हजार अनुदानही जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

अलिबागचा पांढरा कांदा हा गुणकारी आणि औषधी आहे. त्याला भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणेही आवश्यक आहे. मात्र, मागणीप्रमाणे उत्पादन हे कमी असल्याने ते वाढविणे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. वेश्वी, वाडगाव, नेहूली, कार्ले, खंडाळे, पोवळे, रुळे, धोलपाडा, सागाव, तळवली या काही गावांतच पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

इथे क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा!

कृषी विभागाची क्लृप्ती काय?

• अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची शेती केली जाते. साधारण पाच हजार टन उत्पादन दरवर्षी काढले जाते. उत्पादन वाढीसाठी आता कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

• यासाठी शेतकऱ्यांचा कांदा गटही कृषी विभागाने तयार केला आहे. यंदा एक गुंठा क्षेत्रावर कांदा बियाणे लावले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना साडेचार हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

• बियाणे हे तीन हेक्टर क्षेत्रावर तयार करण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून बियाणे वाढले तर लागवड क्षेत्रही वाढले जाणार आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे.

...तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव

अलिबागमधील पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढ आणि लागवड क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला शेतकऱ्यांची साथ मिळणे महत्त्वाचे आहे, या प्रयत्नामुळे अलिबागचा कांदा हा भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव खाऊन जाईल.

हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीशेती क्षेत्रअलिबागरायगडसरकारबाजार