Lokmat Agro >शेतशिवार > Verticle farming: व्हर्टिकल फार्मिंगविषयी असणाऱ्या या तीन मिथकांचे करण्यात आले तज्ञांकडून खंडण

Verticle farming: व्हर्टिकल फार्मिंगविषयी असणाऱ्या या तीन मिथकांचे करण्यात आले तज्ञांकडून खंडण

Verticle farming: These three myths about vertical farming are debunked by experts | Verticle farming: व्हर्टिकल फार्मिंगविषयी असणाऱ्या या तीन मिथकांचे करण्यात आले तज्ञांकडून खंडण

Verticle farming: व्हर्टिकल फार्मिंगविषयी असणाऱ्या या तीन मिथकांचे करण्यात आले तज्ञांकडून खंडण

जाणून घ्या उभ्या शेतीची मिथके, संगणकावर चालणाऱ्या या शेतीविषयी काय चाललंय?

जाणून घ्या उभ्या शेतीची मिथके, संगणकावर चालणाऱ्या या शेतीविषयी काय चाललंय?

शेअर :

Join us
Join usNext

पाण्याची कमतरता, शेतीयोग्य जमिनीची अनुपलब्धता, वाढते तापमानाशी लढत अनेकांनी व्हर्टिकल फार्मिंगचा मार्ग स्विकारला. आधुनिक शेतीचा विकास होऊ लागला असतानाच अनेक देशांनी तंत्रज्ञानाचा वापर करून  आहे त्या जागेत उभ्या पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. जागतिक अन्न सुरक्षेच्या संकटाचा सामना करण्यासाठी हा उपाय अनेक देशांनी स्विकारला आहे. 

सामान्यत: ही मातीविरहित लागवड मोठ्या ग्रीनहाऊस गोदामांमध्ये होते ज्यामध्ये झाडे ओळींनी कपाटाच्या रकान्यात ओळीने लावलेली असतात. प्रकाश, तापमान, आणि आर्द्रता यसारखे घटक संगणक प्रणालीद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. त्यामुळे उभ्या शेतीला पर्यावरणपुरक शेती म्हणतात.

व्हर्टिकल फार्मिंगचे तीन प्रकार आहेत. हायड्रोपोनिक्समध्ये, वनस्पतींची मुळे द्रव पोषक वातावरणात धरली जातात. एरोपोनिक्समध्ये मुळे हवेच्या संपर्कात येतात आणि पोषक धुके किंवा स्प्रे लावले जातात. एक्वापोनिक्समध्ये फिश फार्मच्या कचऱ्यापासून पोषक तत्वे हायड्रोपोनिक्सद्वारे वनस्पतींना देण्यात येणाऱ्या रासायनिक खतांची जागा घेतात.

लागवडीच्या या पद्धतींनी अन्न पिकवण्याची पद्धत सोपी झाली असली तरी या शेतीबाबत असणारे हे चार मिथके आधी दूर करणे गरजेचे आहे असे 'द कॉनव्हसेशन'ला तज्ञांनी सांगितले.

व्हर्टिकल शेती शाश्वत नाही

हा युक्तीवाद सामान्यत: उभ्या शेतींना लागणाऱ्या वीजेमुळे केला जातो.  अनेक व्यवसायीक उभ्या शेतीत अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर करू लागले आहेत. या शेतीत खतांचा आणि पाण्याचा वापर पुन्हा पुन्हा केला जाऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो.

ही शेती नैसर्गिक नाही
 
 तज्ञ सांगतात की निसर्गता ही व्यक्तीनिष्ठ आहे. निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या प्रक्रीया आणि वातावरण आपल्या पिकांना देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही शेती पारंपरिक जमिनीवर करण्यात येणाऱ्या शेतीपेक्षा मर्यादित स्वरूपाची आहे. पण तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे व्यापक फायदे मिळू शकतात.

उभी शेती प्रत्येकाचे पोट भरेल

ही एक चांगली कल्पना असली तरी व्हर्टिकल फार्मिंग पिकांची विक्री प्रीमीयमवर केली जाते. म्हणजे त्याची किंमत खूप अधिक असते. व्हर्टिकल फार्मिंगमध्ये पायाभूत सुविधांसाठी लागणारे भांडवल अधिक असल्याने त्याची विक्रीही अधिक दरात होते. परिणामी देशातील लोकसंख्येचा विचार करता हे परवडण्यासारखे नाही.

Web Title: Verticle farming: These three myths about vertical farming are debunked by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.