Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रंगल्या मुलींच्या कबड्डी स्पर्धा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रंगल्या मुलींच्या कबड्डी स्पर्धा

Vasantrao Naik Marathwada Agricultural University held Girls' Kabaddi Tournament | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रंगल्या मुलींच्या कबड्डी स्पर्धा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रंगल्या मुलींच्या कबड्डी स्पर्धा

फुलंब्री कबड्डी मुलींसंच्या संघाला मिळाले विजेतेपद

फुलंब्री कबड्डी मुलींसंच्या संघाला मिळाले विजेतेपद

रविंद्र शिवूरकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत आंतर महाविद्यालयीनकबड्डी स्पर्धेत चिकटीची झूंज देत पार्थीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा विद्यार्थी कल्याण अधिकारी परभणी येथे दि. 27 ऑक्टोंबर रोजी पार पडल्या. स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबडी (मुली) स्पर्धा या स्पर्धेत अंतीम सामना हा कृषी महाविद्यालय पाथ्री, व अन्नतंत्र महाविद्यालय परभणी यांच्यामध्ये झाला. या स्पर्धेत कृषी महाविद्यालय पाथ्री फुलंब्री संघाने चिकाटीची  झुंज देत प्रथम क्रमांक  पटकावला तर अन्नतंत्र महाविद्यालय परभणी यांनी द्वीतीय क्रमांक  पटकावला. विजयी संघाला  मित्र साधना  शिक्षण प्रसारक मंडळ पाथ्री चे अध्यक्ष. मा.श्री. द्वारकाभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष मा. राजेंद्र पाथ्रीकर, सचिव उषाताई पाथ्रीकर, सहसचिव वरुणभैया पाथ्रीकर, व वर्षाताई पाथ्रीकर यांनी विजयी संघाला शुभेच्छा दिल्या, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दगडे सर, डॉ. नागरगोजे सर, व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी ही विजयी संघाला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या मुलीच्या कबड्डी संघाला मनगटे प्रमोद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Vasantrao Naik Marathwada Agricultural University held Girls' Kabaddi Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.